कोल्हापूर : टोलप्रश्नी आज, सोमवारी मुंबईत लवादासमोर ‘आयआरबी’, महापालिका आणि मूल्यांकन समितीचे प्रतिनिधी आपली बाजू लेखी स्वरूपात मांडणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘आयआरबी’चे देणं दि. ६ सप्टेंबरला निश्चित करणार आहेत. टोलप्रश्नी मागील मंगळवारी (दि. ११) झालेल्या बैठकीत ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, महापालिका व कृती समिती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोनसदस्यीय लवादासमोर मूल्यांकनाबाबत आपली बाजू मांडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व अन्य उपस्थित होते.दोन्ही बाजूंनी जोरदार बाजू मांडल्याने कोणीही आपल्या मतांपासून दूर हटले नाही. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लवादासमोर ‘आयआरबी’ व महापालिका यांना लेखी स्वरूपात नेमकं किती देणं आहे, याची विस्तृत माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोन्हींकडून बाजू मांडली जाईल. ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, ‘महापालिकेतर्फे शहर अभियंता, तर मूल्यांकन समितीचे आर्किटेक्ट राजू सावंत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके हे आपली बाजू लवादासमोर स्पष्ट करणार आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवाद आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ‘आयआरबी’चं देणं किती हे ६ सप्टेंबरला निश्चित करण्याची शक्यता आहे. आयआरबी’चं देणं किती, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ सप्टेंबरला निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी देणं भागविताना ते संपूर्ण राज्य शासनाकरवी द्यावे. कोल्हापूर महापालिकेवर त्याचा बोजा टाकू नये. कारण महापालिकेची सद्य:स्थितीत आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आमची कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी ते देणं राज्य शासनाच्या गंगाजळीतून द्यावे. - निवासराव साळोखेटोलविरोधी कृती समिती, कोल्हापू
‘आयआरबी’च देणं ६ सप्टेंबरला ठरणार
By admin | Updated: August 17, 2015 00:47 IST