शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इराणी, बंडारू यांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: January 23, 2016 00:50 IST

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : काँग्रेसतर्फे गडहिंग्लजला मोर्चा; इचलकरंजीत निदर्शने

गडहिंग्लज/इचलकरंजी : वाढती महागाई व असहिष्णुतेसह हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रेय यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी युवक काँगे्रसतर्फे येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. तर इचलकरंजी येथे के. एल. मलाबादे चौकात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.गडहिंग्लमध्ये लक्ष्मी मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून मोर्चा प्रांतकचेरीसमोर आला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.निवेदनात, हैदराबाद येथील दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नि:पक्ष चौकशी व्हावी, संजय गांधी पेन्शन योजनेची रक्कम किमान एक हजार रुपये करावी, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चात प्रदेश सचिव धु्रवी लकडे, शंभूराजे देसाई, विद्याधर गुरबे, रंगराव मेतके, प्रशांत देसाई, वैभव ताशीलदार, संदीप पाटील, राम पाटील, उत्तम आंबवडेकर, सरदार पाटील, दीपक थोरात, दिग्विजय कुराडे, रूपाली पाटील, आदींसह युवक-युवती सहभागी झाले होते. इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय मंत्री आणि कुलपती बंडारू दत्तात्रय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, रवी रजपुते, अविनाश कांबळे, आदींची भाषणे झाली. शेखर शहा, रमेश कबाडे, संजय केंगार, के. के. कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.शिरोळमध्ये मेळाव्यात निषेध, कँडल रॅलीशिरोळ येथे तालुका युवक कॉँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश कॉँग्रेसच्या सरचिटणीस धु्रवीताई लकडे होत्या. यावेळी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस ऋत्वीज जोशी, जयराज पाटील, सचिन माच्छरे, उपसरपंच पृथ्वीराज यादव, अमृत भोसले, रणजितसिंह पाटील, जवाहर सलगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.