शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

घनकचरा ठेकेदारीत वरिष्ठ अधिकाऱ्याची भागिदारी : शेखर माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:33 IST

न्यायालयीन आदेशाप्रमाणे महापालिकेनेच प्रकल्प राबवावा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : हरीत न्यायालय, राज्य शासन, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, महापालिकेचे वकिल या सर्वांचे आदेश व अभिप्राय डावलून महापालिकेत घनकचºयाची ठेकेदारी रेटली जात आहे. मंजूर ठेकेदारीत महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाºयाची अप्रत्यक्ष भागिदारी (स्लिपिंग पार्टनरशीप) असल्याने हा प्रकार सुरू आहे, अशी टीका शिवेसेना नेते शेखर माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, २९ डिसेंबर २0१६ रोजी पुण्यातील हरीत न्यायालयाने घनकचºयाचा जो डीपीआर मंजूर केला आहे, तो कोणालाही बदलण्याचा अधिकार नाही. न्यायालयीन आदेशानुसार हा प्रकल्प मंजूर आराखड्यानुसार महापालिकेलेचा राबवायचा आहे. यात ठेकेदार नियुक्त करता येत नाही. महापालिकेच्या वकिल पॅनेलवरील मुख्य सल्लागार असलेल्या वकिलांनीही डीपीआर बदलता येत नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला होता. याशिवाय शासनाने प्रकल्पास मंजुरी देताना हा प्रकल्प महापालिकेने राबवावा, अशी स्पष्ट सूचना दिली आहे. तरीही यात ठेकेदार नियुक्त करण्यात आला. शासनाच्या सर्व सुचनांचे उल्लंघन महापालिकेने केले. सर्व प्रकारचे अभिप्राय, सूचना, आदेश डावलले गेल्याने आम्ही याविरोधात लढा देत आहोत.घनकचरा प्रकल्पाची ठेकेदारी रद्द करून तो महापालिकेस चालविण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयंत पाटील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित कागदपत्रांद्वारे केली आहे. याशिवाय दिल्लीतील हरीत न्यायालयात अवमान याचिका व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही लूट थांबविणार आहोत.

महापालिकेने घनकचरा प्रकल्पाची निविदा काढून जो ठेकेदार नियुक्त केला आहे. त्यामध्ये महापालिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाºयाची अप्रत्यक्ष भागिदारी असल्याने हे प्रकार सुरू आहेत. याबाबतची कल्पना मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना दिली आहे. महापालिकेच्याच पैशावर ठेकेदार बिनभांडवली प्रकल्प राबवू पहात आहे. त्यामुळे ही शासनाच्या व पर्यायाने जनतेच्या पैशाची लूट आहे. तिजोरीवरील दरोड्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू.

असे आहे ठेकेदारीचे गणितमाने म्हणाले की, ठेकेदाराकडून या प्रकल्पासाठी ३७ कोटी ४0 लाखाची गुंतवणूक होणार आहे. त्यातही सुरुवातीला प्रकल्प उभारणीसाठी महापालिकाच २७ कोटी देणार आहे. त्यामुळे ठेकेदाराची गुंतवणूक फारशी होणार नाही. प्रकल्पासाठी टीफिन फी म्हणून प्रतिटन प्रतिदिन ७१0 रुपये ठेकेदाराला द्यायचे आहेत. म्हणजेच सात वर्षात ४२ कोटी रुपये महापालिकेकडून मिळणार. खत विक्रीतून ठेकेदारास सात वर्षात १६0 कोटीचे उत्पन्न मिळणार आहे. कचºयातील प्लास्टिक, लोखंडी साहित्यरुपी भंगार व इतर गोष्टीतून ठेकेदारास ४५ कोटी मिळणणार आहेत. असे सात वर्षात ठेकेदारास ३२३ कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच कोणत्याही गुंतवणुकीशिवाय एवढे मोठे उत्पन्न देणारा हा प्रकल्प आहे.