शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीच्या लढ्यात गावांचा सहभाग घ्या : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:45 IST

CoronaVIrus NarendrModi Collcator Kolhapur : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम क्वारंटाइन, आयसोलेशन अशा जबाबदाऱ्या सोपवा, एक एक गाव कोरोनामुक्त करत जा, आपल्या जिल्ह्यात राबवलेल्या प्रभावी उपाययोजना केंद्र शासनाकडे पाठवा त्या देशभर राबवण्यात येतील अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या लढ्यात गावांचा सहभाग घ्या : नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी : जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम क्वारंटाइन, आयसोलेशन अशा जबाबदाऱ्या सोपवा, एक एक गाव कोरोनामुक्त करत जा, आपल्या जिल्ह्यात राबवलेल्या प्रभावी उपाययोजना केंद्र शासनाकडे पाठवा त्या देशभर राबवण्यात येतील अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात मोठा संसर्ग झाला असून या कठीण काळात काम करत असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्ष‌वर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. या संवादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली.पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या कठीण काळात गावागावात आलेला कोरोना रोखण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी तेथील नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्या, एखाद्या गावात कमी रुग्ण असतील तर तेथील बाधितांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करा, एक एक गाव कोरोनामुक्त करत पुढे जा. त्यामुळे अधिक संवेदनशील किंवा हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल. अन्य गावांमुळे येणारा ताण कमी होईल.

आपण जिल्ह्यात राबवलेल्या कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरल्या त्या केंद्र शासनाकडे पाठवा, या उपाययोजना देशभर राबवले जातील. सर्वकष प्रयत्नातून आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरदेखील विजय मिळवू. आपण सगळे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहातच. यापुढेही असेच कार्यरत राहा, अशा शब्दात त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांनी सुरुवातीला देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. अहमदनगर येथील अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर