शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वाहतुक अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 15:13 IST

कोल्हापूर : लाईनबाजारमधील झुम प्रकल्पावरील विघटन न होणाºया कचºयाची होत असलेली वाहतुक अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. उघड्या डंपर व ट्रकमधून वाहतुक केला जाणारा कचरा रस्त्यावर पडत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत असून त्यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. भविष्यात अपघात टाळायचे असतील तर महानगरपालिका प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

ठळक मुद्देबावडा ते शिये रस्त्यावर ट्रकमधून पडतोय कचराकचरा वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने घ्याकचरा रस्त्यावर पडणार नाहीत, याची खबरदारी घण्याची मागणी

कोल्हापूर : लाईनबाजारमधील झुम प्रकल्पावरील विघटन न होणाºया कचºयाची होत असलेली वाहतुक अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. उघड्या डंपर व ट्रकमधून वाहतुक केला जाणारा कचरा रस्त्यावर पडत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत असून त्यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. भविष्यात अपघात टाळायचे असतील तर महानगरपालिका प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

संपूर्ण कोल्हापूर शहरातील कचरा झुम प्रकल्पांवर साठविला जातो. गेल्या दोन अडीच वर्षापासून या कचºयाची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली गेली नसल्याने हा कचरा तसाच पडून होता. कचºयाचे ढीगच्या ढीग साचल्याने लाईनबाजार, कसबा बावडा परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हा कचरा तेथून हटविण्यात यावा, अशी मागणी नागरीकांकडून होत होती. त्यामुळे हा कचरा त्याठिकाणाहून हलविण्यात येत आहे.

झुम प्रकल्पातील हा विघटन न होणारा कचरा लाईनबाजार येथून राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या सरवळीत टाकला जात आहे. उठाव करण्याचा ठेका देण्यात आला आहे. ठेकेदाराने कचरा वाहतुक करण्याकरीता उघडे डंपर घेतले असल्याने कचरा नेत असताना तो वाºयामुळे तसेच हादºयामुळे डंपरमधील कचरा उडून तो खाली रस्त्यावर पडत असतो.

डंपरच्या मागून जाणाºया दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर कचरा पडतो. त्यातील बारीक कण डोळ्यातही जातात. तसेच चारचाकी वाहनांवरही हा कचरा पडतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सद्या पावसाळा असल्याने रस्त्यावर पडलेल्या कचºयामुळे रस्ता निसरटा होतो. दुचाकी घसरुन वाहनधारक जखमी होण्याचा संभव आहे.

उघड्या ट्रकमधून होत असलेल्या या कचरा वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. यामुळे छोटे छोटे अपघात झाले आहेत. भविष्यात अपघातामुळे जीवीत हानी होण्याची प्रतिक्षा न करता कचरा रस्त्यावर पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.ट्रकमधून वाहतुक केला जात असलेला कचरा वाºयाच्या प्रवाहाने रस्त्यावर पडतो हे खरे आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यापासून दररोज रस्ते लोटण्यासाठी कसबा बावडा ते शिये पुलापर्यंत कर्मचारी नेमले आहेत.डॉ. विजय पाटील,