शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दाम्पत्याचं स्वप्न साकार; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:32 IST

सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना

ठळक मुद्देविनायक राऊत यांच्याकडून संजय सावंत यांना फोनवरून निमंत्रण--: विठ्ठलभक्ती फळास

भागवत काटकर ।शेगाव : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व आघाडीचे शासन पाच वर्षे टिकावे, यासाठी बनाळी (ता. जत) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना नेते संजय सावंत व त्यांच्या सौभाग्यवती रूपाली सावंत यांनी ग्रामस्थांसह पंढरपूरला पायी अनवाणी चालत जाऊन विठुरायाच्या चरणी साकडे घातले होते. आता सावंत यांनी घातलेले साकडे पंढरीच्या विठ्ठलाने पूर्ण केले असून, सावंत यांना थेट ‘मातोश्री’वरून खासदार विनायक राऊत यांनी फोन करून, मुख्यमंत्री शपथविधीसाठी सपत्नीक निमंत्रित केले आहे. त्यामुळे सावंत दाम्पत्य मंगळवारीच मुंबईकडे रवाना झाले.

सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी पडळकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऊर्फ बंटी दुधाळ, राहुल पाटील, बी. आर. सावंत, उद्धव सावंत, सिद्राम माळी, हनुमंत कोरे, सावळा माळी, अनिल सावंत,  तुकाराम जाधव, प्रकाश सावंत, जी. एस. सावंत, गणेश कोडग, गणेश सावंत, गणेश काशीद, राजश्री माळी, लक्ष्मी माळी सहभागी होते.    दरम्यान, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खानापूर तालुक्यात आले होते. त्यावेळी ठाकरे यांची सावंत दाम्पत्यांनी भेट घेत, मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा व आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे यासाठी पंढरीला पायी चालत गेल्याचे सांगितल्यावर, पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंत दाम्पत्याला शपथविधीस बोलावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सावंत यांना राऊत यांनी फोनवरून शपथविधीचे आमंत्रण दिले. वीणा, तुळशी वृंदावनसह सावंत दाम्पत्य मुंबईस रवाना झाले आहे.

टॅग्स :ministerमंत्रीShiv SenaशिवसेनाSangliसांगली