लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : २०१५ साली झालेल्या आमसभेत आमदार वैभव नाईक यांनी ‘सी-वर्ल्ड’च्या मुद्द्याला बगल दिली होती. मात्र, शनिवारी झालेल्या आमसभेत काँग्रेसच्या गोटातून टप्प्याटप्प्याने कोंडीत पकडण्यात येत असताना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश जावकर यांनी आमदारांना आपली सी-वर्ल्डविषयी भूमिका काय आहे? हे जनतेसमोर स्पष्ट करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार नाईक यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी सरकारला गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्यावर आता भूमिका स्पष्ट करणे योग्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाचा आराखडा नसेल तर गुंतवणूकदार कसे येतील?, असा सवाल केला. आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडे सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी गुंतवणूकदार नसल्याची धक्कादायक माहिती दिली. वायंगणी-तोंडवळी येथे साकारणारा सी-वर्ल्ड प्रकल्प हा राजकीय विषय बनला आहे. त्यात आमदार नाईक यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पास कुणीही गुंतवणूकदार शासनाकडे आला नाही. त्यामुळे प्रकल्पाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रश्नच येत नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले. +भूसंपादन करणे संयुक्तिक नाहीआमदार नाईक म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाची गुंतवणूक पाच हजार कोटींपर्यंत गेलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीस अद्याप कुणीही गुंतवणूकदार सरकारकडे आलेला नाही. सरकारला गुंतवणूकदाराची प्रतीक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदार हाती नसताना स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी अगोदर संपादित करणे संयुक्तिक नाही. म्हणूनच आराखडा तयार करण्याचा प्रश्नच येत नाही. गुंतवणूकदार मिळाल्यास प्रकल्पास चालना मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
‘सी-वर्ल्ड’ला गुंतवणूकदारांची प्रतीक्षा
By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST