शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

‘सायबर’मध्ये इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:57 IST

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५१ महाविद्यालयांतील इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलचे रविवारी जम्मू-काश्मीर येथून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ...

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५१ महाविद्यालयांतील इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलचे रविवारी जम्मू-काश्मीर येथून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या या संवादाने कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयातील उपस्थितही भारावून गेले.‘राष्टÑीय उच्चतर शिक्षा अभियान’ या योजनेंतर्गत राज्यातील निवडक महाविद्यालयांमध्ये ‘सायबर’ महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या अनुदानातून ‘सायबर’मध्ये ‘इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल व स्किल हब’सह देशभरातील अनुदानप्राप्त झालेल्या ५१ संस्थांमध्ये एकाचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘नॅशनल इंफोर्मेटिक सेंटर’च्या माध्यमातून रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आमदार अमल महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरूडॉ. डी. टी. शिर्के, ‘सायबर’चे विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे, डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. एम. एम अली, आदी प्रमुख उपस्थित होते.‘सायबर’मधील ‘ईडी सेल अ‍ॅँड स्किल हब’ या विभागाची अंतर्गत उद्योजकता विकासासाठी लागणाऱ्या सर्व सोईसुविधा, मार्गदर्शन, प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी लॅँग्वेज लॅब व मॅनेजमेंट लॅब, आदींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्राद्वारे सर्व प्रकारच्या स्टार्टअपना ही समर्थन मिळणार आहे, अशी माहिती डॉ. विशाखा आपटे यांनी दिली.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी योजनेचे समन्वयक डॉ. सी. एस. दळवी, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. शंकरराव कुलकर्णी, ऋषिकेश श्ािंदे, प्रतिभा दीक्षित, दीपक भोसले आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.