शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची आस’ लघुपट आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:10 IST

शिरोली : वडील रिक्षाचालक...आई गृहिणी... घरची परिस्थिती बेताचीच...पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ८० हजार रुपये खर्च करून शिरोलीच्या गणेश खोचीकर या युवकाने

सतीश पाटील ।शिरोली : वडील रिक्षाचालक...आई गृहिणी... घरची परिस्थिती बेताचीच...पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल ८० हजार रुपये खर्च करून शिरोलीच्या गणेश खोचीकर या युवकाने ‘शिक्षणाची आस’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत मोठी झेप घतली आहे. १४ डिसेंबरपासून कोल्हापुरात होणाºया ‘किफ’ या सहाव्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी या फिल्मची निवड झाली आहे.गणेश खोचीकर हा शिरोली

(ता. हातकणंगले) येथील २१ वर्षांचा तरुण आहे. तो कोल्हापूर येथील राजारामपुरीतील देवल क्लब तथास्तु फोरम या ठिकाणी फिल्म अ‍ॅन्ड थियटर पदवी शिक्षण घेत आहे.गणेशला लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती. बारावीनंतर गणेशने फिल्म इंडस्ट्रीजमधील फिल्म अ‍ॅन्ड थियटरमधील पदवी शिक्षण घेण्याचे ठरवले सध्या तो शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याने ‘शिक्षणाची आस’ हा लघुपट बनवला आहे.

अतिशय कमी वयात शिरोलीतील गणेशने फिल्म इंडस्ट्रीजमध्ये मोठी झेप घेऊन शिरोलीचं नाव मोठं केले आहे. या लघुपटात प्रमुख भूमिकेत मिथिलेश कैंगारे, यशवंत चौगुले, मयूरी केसरकर, प्रतीक्षा सरवदे, रितेश जाधव हे आहेत.या लघुपटाचे निर्माते अभिजित कोळी आणि विशाल खोचीकर आहेत. तर छायाचित्रण प्रवीण जाधव, तसेच शिवानंद पुय्यम, श्रीधर जाधव, नवनाथ बंडगर, समर्थ भिलवडीकर यांचे सहकार्य लाभले. 

आमच्या दृष्टीने लघुपट चांगला झाला आहे. याला फिल्म फेस्टिव्हलमध्ये निश्चितच मानांकन मिळेल, अशी आशा आहे. यासाठी ८० हजार रुपये खर्च झाला आहे. -अभिजित कोळी,विशाल खोचीकर, निर्मातेशिक्षणाची आस हा वीस मिनिटांचा लघुपट बनविला आहे. माझ्या लघुपटाला निश्चितच मानांकन मिळेल. मी भालजी पेंढारकर यांना गुरू मानतो.- गणेश खोचीकर, दिग्दर्शक