शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कुठे आहे चित्रपट महामंडळ? अस्तित्व राहिले कागदावर; अंतर्गत राजकारणाने पोखरले 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 30, 2025 17:36 IST

शासन दरबारी शून्य महत्त्व; काम ठप्प

इंदुमती गणेशकोल्हापूर : राज्य शासनाने चित्रपट अनुदानासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रमाणपत्राची अट रद्द केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्राला लाभलेल्या सिनेसृष्टीची मातृसंस्था असलेल्या या महामंडळाचे अस्तित्व आता फक्त कागदापुरते मर्यादित राहिले आहे. गेल्या सात वर्षांपासून अंतर्गत राजकारणाच्या वाळवीने महामंडळाचा पायाच ढासळला असतानाही दोन पावले माघार घ्यायची तयारी नाही.. मग, महामंडळ संपले तरी चालेल, अशी एकूण मानसिकता आहे.मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शासन दरबारी लढे देऊन, प्रयत्न करून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना केली. कलावंतांपासून शेवटच्या कामगारापर्यंत सर्वांना न्याय मिळावा, शासकीय योजनांचा फायदा मिळावा यासाठी महामंडळ काम करीत होते. अगदी चित्रनगरीच्या, जयप्रभाचा लढाही महामंडळाच्या पुढाकाराने लढला गेला. पण, आता हा सगळा इतिहास झाला आहे; कारण, गेल्या सात वर्षांपासून अंतर्गत राजकारण महामंडळालाही वरचढ झाले आहे.वादाची कारणे

  • तीन वर्षांत सभासद संख्या २० हजारांवरून ४५ हजारांवर नेली.
  • निवडणुकीत मतदानासाठी पात्र सभासदांची संख्या ७ हजारांवरून ३ हजारांपर्यंत खाली आली.
  • सभासदत्वावरून चार जण उच्च न्यायालयात गेले.
  • उच्च न्यायालयात दावा सुरू असतानाच आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

तीनवेळा बैठका निष्फळया वादातून तोडगा काढण्यासाठी काही जणांच्या मध्यस्थीने तीनवेळा अध्यक्ष व संचालकांमध्ये बैठका झाल्या आहेत. शेवटच्या बैठकीत तर समझोता झाल्याचे सगळ्यांनी जाहीर केले; पण, महिन्याभराने पुन्हा दोन्ही बाजू एकमेकांविराेधात पुढे आल्या. सध्याच्या संचालकांची २०१५-२६ साली निवडणुकीने नियुक्ती झाली. तीन वर्षांनी त्यांच्यात वाद सुरू झाले. आता मुदत संपून पाच वर्षे झाली तरी यांच्यातील वाद मिटेनात.

वाद मिटविण्यासाठी मी तीनवेळा पुढाकार घेतला; पण, ते सर्वोच्च न्यायालयातील दावा मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयात केस उभी राहिली नाही. या वादामुळे एम्फा, निर्माता महामंडळ, वेस्टर्न इंडिया अशा खासगी संस्था मोठ्या होत आहेत. आता प्रमाणपत्राची अटही रद्द केल्याने महामंडळाला महत्त्वच राहिले नाही. मेघराज भोसले अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

मी शब्द देतो. अध्यक्ष उच्च न्यायालयातील दावा मागे घेणार असतील तर आम्ही पण सर्वोच्च न्यायालयातील दावा मागे घेऊ. महामंडळाला २० हजार सभासद करायला २० वर्षे गेली यांनी तीन वर्षांत ४५ हजार सभासद कसे केले, हा आमचा आक्षेप आहे. नियमानुसार जेवढे सभासद पात्र आहेत तेवढ्या जणांवर निवडणूक होऊन जाऊ दे. - मिलिंद अष्टेकर, निर्मिती व्यवस्थापक