शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेअकरा लाख बँक ग्राहकांना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:51 IST

तरी जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे ही माने यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक : विमा योजनांचे नूतनीकरण

कोल्हापूर -- जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेंत सहभाग नोंदविला आहे, या विमा योजनांच्या नूतनीकरणास येत्या २५ मेपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांनी शनिवारी येथे दिली.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नूतनीकरण मोहीम जिल्ह्यात उद्या, सोमवार ते १ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत ७ लाख ८० हजार बँक ग्राहकांनी तर जीवन विमा योजनेंतर्गत ३ लाख ९२ हजार बँक ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून यापुढील काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल माने यांनी केले आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी २ लाखांपर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता केवळ बारा रुपये आहे. तर जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाखांपर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे. तरी जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे ही माने यांनी कळविले आहे.

टॅग्स :bankबँकMONEYपैसा