शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

विमा कंपनीला झटका

By admin | Updated: December 2, 2015 00:36 IST

अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला.

गोंदिया : अपघात विमा घेण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आपआपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला. परंतु कृषी अधिकारी कार्यालयाने दिरंगाई करुन अर्जदारांना नाहक त्रास देण्याचा प्रकार केला. या संदर्भात विमा कंपनी व तालुका कृषी अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने व्याजासह अर्जदारांना विम्याचे पैसे देण्याचे आदेश शुक्रवार (२७) रोजी देण्यात आले. आमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या मालकीची सर्वे नंबर ३९६/१ चिरचाळबांध येथे त्यांची जमीन आहे. रेल्वेच्या धडकेत १ मे २०१३ रोजी सुखराम भांडारकर यांचा मृत्यु झाला. या संदर्भात त्यांची पत्नी हिरन सुखराम भांडारकर रा. कुणबीटोला यांनी कृषी अपघात विम्याचे १ लाख रुपये मिळावे यासाठी कृषी अधिकाऱ्याकडे १६ डिसेंबर २०१३ रोजी अर्ज केला. परंतु दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने दस्तावेज नसल्याचे कारण दाखवून त्यांचा दावा फेटाळला. यासंदर्भात त्यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी ग्राहक मंचात तक्रार केली. या प्रस्तावात घटनास्थळ पंचनामा न दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू नाही तर आत्महत्या असल्याचे कारण सांगून विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळला होता. दुसरे प्रकरण देवरी तालुक्यातील मुल्ला येथील आहे. मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते २० सप्टेंबर २०१३ रोजी शेतात काम करीत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावाची शेती सालेकसा तालुक्याच्या धानोली येथे आहे.यासंदर्भात त्यांचा मुलगा देवेंद्र ताराचंद भुते यांनी ३ डिसेंबर २०१३ रोजी तालुका कृषी अधिकारी देवरी यांच्याकडे अर्ज केला. परंतु विमा कंपनीने त्यांचे प्रस्ताव मंजूर केले नाही. या संदर्भात भुते यांनी २३ मार्च २०१५ रोजी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात अर्ज केले. वारसानाचे नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सदर प्रकरण नामंजूर करावे असे विरुद्ध पक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते. परंतु तक्रारकर्ता एकटाच वारसान असून त्यांच्या बहिणींचे लग्न झाल्यामुळे सध्या वारसान ते एकटेच आहेत हे स्पष्ट झाले. दोन्ही आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)ग्राहक न्यायालयाने असा दिला आदेशआमगाव तालुक्याच्या कुणबीटोला येथील शेतकरी सुखराम दशरथ भांडारकर यांच्या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने अपघाती विम्याचे १ लाख रुपये १७ एप्रिल २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच तक्रारकर्तीला मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये, तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले. तर मुल्ला येथील फुलनबाई ताराचंद भुते यांच्या प्रकरणात १ लाख रूपये व ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. २३ मार्च २०१५ पासून दरसाल, दरशेकडा ९ टक्के व्याजदराने १ लाख रुपयाचा व्याजासह महिन्याभराच्या आत देण्याचे आदेश दिले.