शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोरोना प्रतिबंधात्मक लसीची अपुरा पुरवठा, फिरंगाई केंद्रावर वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:53 IST

Corona vaccine Kolhapur-महानगरपालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे बुधवारी नागरिकांना केंद्राबाहेर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. लस उपलब्ध न झाल्याने महापालिकेच्या शिवाजीपेठेतील फिरंगाई हॉस्पिटल आरोग्य केंद्र क्रमांक २ येथे आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वादावादी झाली. बराच वेळ वाट पाहूनही लस मिळणार नाही म्हटल्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक लसीची अपुरा पुरवठा फिरंगाई केंद्रावर नागरिक - आरोग्य कर्मचाऱ्यांत वादावादी

कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे बुधवारी नागरिकांना केंद्राबाहेर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. लस उपलब्ध न झाल्याने महापालिकेच्या शिवाजीपेठेतील फिरंगाई हॉस्पिटल आरोग्य केंद्र क्रमांक २ येथे आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वादावादी झाली. बराच वेळ वाट पाहूनही लस मिळणार नाही म्हटल्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाकडून महानगरपालिकेला कमी प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळत आहे. पालिकेच्या अकरा केंद्रांवर रोज प्रत्येकी तीनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. त्यासाठी ३३०० ते ३५०० डोस रोज लागतात. नागरिकांचा लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांची संख्या आणि डोसची संख्या यात तफावत निर्माण झाली आहे. मागणीपेक्षा डोस कमी मिळत आहेत.शिवाजी पेठेतील फिरंगाई हॉस्पिटलमधील आरोग्य केंद्र क्रमांक २ येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता जेव्हा लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा रांगेत दीडशे ते पावणेदोनशे नागरिक थांबले होते. त्यावेळी आरोग्य केंद्राकडे १५० डोस शिल्लक होते. दरम्यानच्या काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता भिसे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून डोस मागविले. एकीकडे रजिस्ट्रेशन तर दुसरीकडे लसीकरण सुरू होते.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिल्लक डोस संपले आणि फुले रुग्णालयातूनही डोस वेळेत आले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमधून चुळबुळ सुरू झाली. दोन अडीच तास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही म्हटल्यावर त्यांच्या राग अनावर झाला. त्यांनी आरोग्य कर्मचांऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डोस शिल्लक नाहीत तर आम्हाला आधी का सांगितले नाही, रांगेत उभे राहण्यास का सांगितले, अशा संतप्त सुरात विचारणा करण्यात येऊ लागली. वाद वाढत जाईल तसे रांगेतील काही नागरिक परत गेले. दुपारी दोननंतर १०० डोस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर