शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:23 IST

परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

ठळक मुद्देअपुरी, चुकीची माहिती हेच ई-पास नाकारण्याचे कारणसाडेचार हजार पास प्रलंबित : प्रतिदिन तीन हजार पासची नोंदणी

कोल्हापूर : परगावी जाण्यासाठी नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या ई-पास अर्जात अपुरी आणि चुकीची माहिती भरल्याने गेल्या चार महिन्यांत एक लाख ६८ हजार ई पास प्रशासनाने नामंजूर केले. एक लाख २८ हजार अर्ज मंजूर असून सध्या केवळ चार हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. आजही प्रतिदिन ऑनलाईन सरासरी तीन हजार अर्ज केले जातात.

कोल्हापूरच्याजिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त बाहेरगावी जाण्यासाठी पास दिले जातात. पुणे किंवा अन्य कोणत्याही शहरातून कोल्हापुरात यायचे असेल तर ते पास संबंधित जिल्ह्याकडून दिले जातात; परंतु तरीही लोक येथे येऊन तक्रारी करतात.मेपासून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून महसूलचे १० हून अधिक कर्मचारी केवळ ई-पास देत आहेत. मंजूर पासच्या तुलनेत पास नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. त्याबाबत सोमवारी (दि. १०) रात्री ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनीही सोशल मीडियावर तक्रार केली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गवस यांच्या जावयाचा पास तातडीने मंजूर करून दिला.कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हे ई-पास मंजूर केले जातात. शिवाय ते केवळ एका दिवसासाठीचेच असतात. म्हणजे व्यक्ती बाहेरगावी गेली की पुढील २४ तासांतच त्यांनी परत कोल्हापुरात येणे अपेक्षित असते. मात्र अनेकजण तीन-चार दिवसांच्या मुदतीचे अर्ज करतात, काहीजणांनी आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली नसते.

अनेकजण योग्य कारण देत नाहीत. त्यांचे कारण आणि मंजुरीच्या तारखेत ताळमेळ नसतो. खूप वेळा तर अर्ज मंजूर झालेला असतो; पण त्यांनी लिंकवर जाऊन ते बघितलेलेच नसते. बऱ्याचदा काहीतरी कारण द्यायचे आणि तुम्ही पास मंजूरच का करत नाही म्हणून भांडत यायचे अशा प्रकारांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.नाकारण्याची कारणे

  • इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येण्याचा अर्ज
  • परतीचा कालावधी २४ तासांहून अधिक
  • आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र न जोडणे
  • कारण नीट न लिहिणे, अथवा अपुरी व चुकीची माहिती

सध्या विभागाकडे गेल्या दोन दिवसांचेच अर्ज प्रलंबित आहेत. तातडीचे आणि अत्यावश्यक कारण असेल तर नागरिकांनी परगावी जावे. त्यासाठीचे अर्जही व्यवस्थित व प्रशासनाच्या नियमानुसार भरावेत.-रंजना बिचकरई-पास मंजूर कक्ष अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर