शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी, अधिकारी यांनाही कोरोनाच्या काळात काळजी घेण्याच्या केल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:09 IST

कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या सूचनाआरोग्य प्रधान सचिव : कार्यालय प्रमुखांना लक्ष ठेवण्याचे निर्देश : ‘कोरोना’चा सामना करताना घ्या दक्षता

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेले विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत; त्यांचे संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासकीय परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

‘लॉकडाऊन’च्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपत्कालीन सेवा म्हणून विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. महसूल, आरोग्य, पोलीस, वीज वितरण, पुरवठा विभाग, आदी विभागांतील अधिकारी व कर्मचा-यांचा यामध्ये समावेश आहे. कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या प्रमुखांनी करावी. या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शक सूचना अशा : कर्तव्यावर जाताना गणवेशाबरोबरच मास्क, हातमोजे व आवश्यकतेनुसार अ‍ॅप्रन परिधान करावे. कार्यालयात साबण, पाणी व हॅँड सॅनिटायझर ठेवावे, दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत व त्यानंतर हातमोजे घालावेत. हातमोजे घातल्यावर चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये व हातमोजे खिशात ठेवू नयेत. कार्यालयात काम करीत असताना दोन व्यक्तींंमधील अंतर कमीत कमी एक मीटर ठेवावे. कार्यालयातून घरी गेल्यावर अंघोळ करावी. 

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस