शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

कुरुंदवाडला ५८ पीर पंजांची प्रतिष्ठापना

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

सांगरुळात पंजे प्रतिष्ठापना

कुरुंदवाड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण कुरुंदवाड व परिसरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. शहरामध्ये एकूण १८ ठिकाणी, तर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये ४० अशा एकूण ५८ पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आकर्षक कमान आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघत आहे.शहरामध्ये झारी पीर, बारगीर पीर, गोधडे पीर, भैरववाडी पीर, मुजावर पीर, बागवान पीर, मोमीन पीर, कारखाना पीर, कुडेखान पीर, वड्डेपीर, ढेपणपूर पीर, खाटीक पीर, शेळके पीर, ढाल कारखाना पीर, बडे नालसाब पीर, ढाल पीर अशा १८ पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील कवठेगुलंद, बस्तवाड, नवेदानवाड, जुने दानवाड, टाकळी येथे प्रत्येकी एक पंजाची, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अकिवाट, राजापूर येथे दोन पीर पंजांची, घोसरवाड, खिद्रापूर येथे चार, तर शिरढोण, हेरवाड, अब्दुललाट येथे प्रत्येकी पाच पीर पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे.दरम्यान, मोहरम शांततेत पार पडावा यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पोलीस ठाण्यांतर्गत गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांच्या प्रमुख लोकांची शांतता बैठक घेऊन मोहरम शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर) सांगरुळात पंजे प्रतिष्ठापनासांगरुळ : सांगरुळ येथे मोहरमनिमित्त विविध ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमसाठी विविध धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने होत आहेत.पोलीस पाटील बाजीराव खाडे यांच्या हस्ते खाईत कुदळ मारून मोहरमची सुरुवात केली. यावेळी माजी सरपंच आनंदा नाळे, माजी पोलीस पाटील तानाजी नाळे, सुशांत नाळे, सांगरुळ मशिदीचे ट्रस्टी सिराज मुल्ला, महंमद मुल्ला, एस. वाय. मुल्ला, नजीर मुल्ला, फैजुल्ला मुल्ला, सायबीद मुल्ला उपस्थित होते.सोमवारी खत्तल रात्र होणार असून त्यादिवशी सैली, अटी, हार, अत्तर, गंध लावणे असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री सर्व पंजे मशालसहीत साहब पीर दर्गा भेटीस जाणार आहेत.मोहरमनिमित्त सांगरुळ मशिदीमध्ये चॉँदसाब स्वारी, नाल्या हैदर, मौला अली, सरकारी पंजा, हुसेन पंजा यांची प्रतिष्ठापना केली आहे. मध्यभागी फातिमा पंजासह सात पंजांची स्थापना व एक निशाण आहे. मंगळवारी सवाद्य मिरवणुकीने पंजे विसर्जनासाठी जाणार आहेत.