शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील माने यांची लोकसभेसाठी चाचपणी

By admin | Updated: January 9, 2017 01:10 IST

झेंड्याचा रंग अनिश्चित : कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न; शेट्टी यांच्या हालचालींवर लक्ष

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरजिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते धैर्यशील माने यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू केली. कोणत्या पक्षातून लढायचे याचा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला जाणार असून, तोपर्यंत विविध पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सत्तेची ताकद देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खासदार राजू शेट्टी हे भाजप सरकार विरोधात आक्रमक होत असल्याने ते आगामी लोकसभेला भाजपसोबत असतीलच असे नाही. शेट्टी याच्या भूमिकेवरच माने यांची राजकीय खेळी राहणार आहे. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात माने घराण्याने अनेक दशके आपला राजकीय दबदबा कायम राखला. लोकनेते बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर दोनवेळच्या संघर्षानंतर निवेदिता माने यांनी खासदारकी खेचली. दहा वर्षे माने यांनी इचलकरंजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण २००९ ला ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. शेट्टींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१४ ला हा मतदारसंघ कॉँग्रेसला सोडून तेथून कल्लाप्पाण्णा आवाडे यांना रिंगणात उतरवले. यामुळे माने गट काहीसा नाराज झाला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी निवेदिता माने यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन पक्षनेतृत्वाने दिले होते, पण ते हवेतच विरले. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिरोळमधून धैर्यशील माने यांचा पत्ता कापला. त्यानंतर धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊनच पुढील राजकीय दिशा निश्चित केली. भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली. माने यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांना देवस्थान समितीचे अध्यक्षपद देऊन आपल्याबरोबर घेतल्याने लोकसभेला तगडा उमेदवारही मिळणार आहे. यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. माने यांनी लोकसभेची तयारी केली. सदाभाऊ मंत्रिमंडळात गेल्यानंतर शेट्टी हे सरकारपासून लांब होत आहेत. राष्ट्रवादीच्या बाहेर राहून माने गटाची बांधणी सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत माने यांनी जयसिंगपूर, कुरुंदवाड, इचलकरंजी, पेठवडगावमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेत पोहोचवून बळ द्यायचे, ही भूमिका घेतली आहे. हातकणंगलेत आवाडेंविरोधात मोटहातकणंगले तालुक्यात आवाडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय मोट बांधली जात आहे. प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. विधानपरिषद निवडणुकीपासून महादेवराव महाडिक यांनी आवाडे यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे आवाडे यांच्या विरोधात विनय कोरे-आवळे-निवेदिता माने-महाडिक-सुरेश हाळवणकर अशी तयारी सुरू आहे. शिलेदार अगोदरच भाजपमध्येस्वर्गीय बाळासाहेब माने यांचे शिलेदार म्हणून ओळख असणारे अशोक स्वामी, जयवंत लायकर, अशोकराव जांभळे, अरुण इंगवले यांनी यापूर्वीच हातात ‘कमळ’ घेतले आहे. जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अशोकराव माने हे वाटेवर आहेत. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.दोन्ही कॉँग्रेसला गळती रोखणे अशक्यआघाडी सरकारच्या काळात सत्तेची पदे ही जिल्ह्णाच्या पश्चिम तालुक्यातच म्हणजे करवीर, कागल, राधानगरी येथेच राहिली. शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याची खदखद कार्यकर्त्यांत आहे. सर्वाधिक गळती येथेच लागल्याचे चित्र आह