शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी पथकाकडूनच जमीन वाटपात डल्ला

By admin | Updated: July 11, 2017 00:50 IST

चौकशी पथकाकडूनच जमीन वाटपात डल्ला

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दूधगंगा प्रकल्पाच्या संकलन रजिस्टरमध्ये ११० लोकांची नोंदच नसताना अशा बोगस व्यक्तींना जमीन वाटप झाल्याची तक्रार २०१४ मध्ये जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात झाली. त्यामध्ये विभागीय आयुक्तांनी याची छाननी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याचे व संकलन रजिस्टर अद्ययावत करण्याचे आदेश दिले, परंतु हा मोका साधून अधिकारी व दलालांनी मूळ गैरव्यवहार तसाच ठेवून लाखो रुपयांची उलाढाल करून नव्याने गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या पथकाने ज्या जमिनींचे वाटप केले, त्यावर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याच्या सह्या नाहीत.‘जनहित याचिका’ही कशी सोयीने गैरव्यवहार करण्यास मदतकारक ठरते याचाच हे प्रकरण म्हणजे उत्तम नमुना आहे. या जनहित याचिकेमध्ये न्यायालयाने ५ सप्टेंबर २०१४ ला विभागीय आयुक्त किंवा अप्पर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयास ६ आॅक्टोबर २०१४ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ही याचिका बाबूराव ऊर्फ तुकाराम एकनाथ पाटील व इतर यांनी दाखल केली. बोगस जमीन वाटपाच्या आदेशासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ७ पुनर्विलोकन याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या; त्यातील ५ याचिका न्यायालयाने मंजूर केल्या आहेत. उर्वरित २ सुनावणीवर आहेत. त्यानंतरही व्यक्तिगत १६ याचिकांमध्ये बोगस आदेश मंजूर झाले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ाुनर्विलोकन याचिका दाखल केल्या आहेत. त्या सुनावणीवर आहेत, परंतु या व्यवहारात बनावट आदेशाद्वारे जमीन वाटप करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते, असे विभागीय आयुक्तांनीही स्पष्टपणे म्हटले आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्या म्हणून विभागीय आयुक्तांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याची सूचना केली खरी, परंतु अधिकाऱ्यांनी त्यातला मूळ गैरव्यवहार बाजूलाच ठेवला व स्वत:चे खिसे भरून घेतले. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर हा मुख्यत: व्यवहार झाला असून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या व्यवहारात कुणाचा किती हात व लाभ झाला हे स्पष्ट होण्यासाठी चौकशी होण्याची गरज आहे.न्यायालयीन प्रक्रियेत संकलन रजिस्टर दुरुस्तीची संधी मिळाल्यावर तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याचे (नायब तहसीलदार दगडे यांच्यासह अन्य अधिकारी) हे पथक नियुक्त केले व त्यामार्फत हा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. अधिकाऱ्यांपासून ते सर्वेअरपर्यंत ही साखळी होती. त्यामुळे इतरवेळी जमीन वाटपाचा आदेश होऊनही तो बजावला जात नाही; परंतु या व्यवहारात आदेश होताच दोन-चार दिवसांत जमिनीचा ताबा देण्याची तत्परता दाखविली गेली आहे. मोहिते यांची विभागीय चौकशी बोगस आदेशाद्वारे जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाल्याने असे आदेश काढण्यास मदत करणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून हिंदुराव चौगले यांना निलंबित केले आहे व तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी सर्जेराव मोहिते यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्तांनी सरकारी वकिलांना (जनहित याचिका क्रमांक १४६/२०१० काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) दिली आहे.सशाला खळगा सामील..न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडावी लागते; परंतु काही याचिकांमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीच संबंधित प्रकल्पग्रस्तांस संकलन रजिस्टरनुसार अमूक एकर जमीन देय असल्याचे प्रतिज्ञापत्र घातले आहे. अधिकाऱ्यानेच असे प्रतिज्ञापत्र घातले म्हटल्यावर न्यायालयानेही मग तातडीने जमीन वाटप करा, असे आदेश दिले आहेत म्हणजे अधिकाऱ्यांना ज्यांना जमीन द्यायची होती त्यांना न्यायालयीन आदेशाचा आधार घेऊन जमीन वाटप झाले. दुर्बोध काम सोपे..जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील नाव ‘सुबोध’ असले तरी कार्याने ‘दुर्बोध’ असलेल्या एका कर्मचाऱ्याचा या व्यवहारात मोठा सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे. ‘साहेबांचा एजंट’ म्हणून तो हे व्यवहार पार पाडत असल्याची चर्चा आहे.कुलूप लावून व्यवहारजिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी असताना त्यांच्या कार्यालयाला अनेकदा बाहेरून कुलूप लावलेले असे. लोक कामासाठी गेल्यावर साहेबांची महत्त्वाची मिटिंग सुरू आहे, असे सांगितले जात असे. दोन-तीन तास हे कार्यालयच बंद राहत असे. या त्यांच्या व्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांनी धरणग्रस्त वारंवार तक्रारी घेऊन येतात व त्याचा मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही दार लावून घेतो, असे उत्तर दिले. परंतु आलेल्या व्यक्तीस भेटून त्याच्या तक्रारींचे निवारण करणे हेच अधिकाऱ्याचे काम असल्याने असे कुलूप पुन्हा लावू नये, असे बजावल्यावर हा मग दरवाजा बंद करणे थांबले.