शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘बालकल्याण’ला बदनाम करणाऱ्या डंबाळ यांचीच चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:08 IST

बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था अशी ओळख व प्रत्यक्ष व्यवहार असलेल्या येथील बालकल्याण संस्थेच्या कारभाराबद्दल निव्वळ पूर्वग्रहदूषित भावनेतून तक्रार करणाऱ्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सल्लागार-सदस्य शिवानंद डंबाळ यांचीच चौकशी करण्याची मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे‘बालकल्याण’ला बदनाम करणाऱ्या डंबाळ यांचीच चौकशी करापदाधिकाऱ्यांची मागणी : संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेवून अधिकाऱ्यांवर नेम

कोल्हापूर : बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था अशी ओळख व प्रत्यक्ष व्यवहार असलेल्या येथील बालकल्याण संस्थेच्या कारभाराबद्दल निव्वळ पूर्वग्रहदूषित भावनेतून तक्रार करणाऱ्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सल्लागार-सदस्य शिवानंद डंबाळ यांचीच चौकशी करण्याची मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.डंबाळ यांच्या नेतृत्वाखालील तीनसदस्यीय पथकाने बुधवारी (दि. २३) या संस्थेची पाहणी करून, कामाबाबत त्रुटी दाखविल्या होत्या. त्याला या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. संस्थेच्या वतीने सुरेश शिपूरकर, व्ही. बी. पाटील, शिवाजीराव कदम, व्यंकाप्पा भोसले, एस. एन. पाटील व मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी एकत्रित भूमिका मांडली.

यावेळी प्रभारी अधीक्षिका अश्विनी गुजर उपस्थित होत्या. संस्थेतील जेवणगृह, स्वच्छतागृहे, डायनिंग हॉल, विधिसंघर्षग्रस्त मुलांची राहण्याची व्यवस्था अतिशय चांगली आहे. आम्ही स्वत:च्या घराची देखभाल करावी इतक्या चांगल्या पद्धतीने या संस्थेची निगा ठेवतो आणि असे कोणीतरी येऊन संस्थेबद्दल खोट्या तक्रारी केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.हे डंबाळ वारंवार कोल्हापूर दौऱ्यावर येतात, त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपली नेहमीच पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. ती पूर्ण न झाल्याने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन म्हस्के यांना त्यांनी अवमानकारक वागणूक दिली. त्यांच्याविरुद्ध म्हस्के यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली व त्यातून डंबाळ यांची चौकशी झाली. त्याचा त्यांना राग होता.माझ्याबद्दल तक्रार करतो काय, त्यांना सस्पेंडच करतो, मला त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार द्या, असा डंबाळ यांचा तगादा होता; परंतु त्याला बालकल्याण संस्थेने प्रतिसाद दिला नाही; म्हणून त्या रागातूनच त्यांनी चांगला कारभार असणाऱ्या संस्थेबद्दल तक्रारी केल्या आहेत. या संस्थेचे स्वत: जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. गेल्याच पंधरवड्यात बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी संस्थेचीी पाहणी करून ‘महाराष्ट्रातील उत्तम संस्था’ असा अभिप्राय संस्थेला दिला आहे.

पाहणी नव्हे, इन्व्हेंट!हे डंबाळ येताना कॅमेरामन घेऊन आले होते. आम्ही अनाथ मुले खेळतानाचे छायाचित्र वृत्तपत्रांत प्रसिद्धीला दिले तर आम्हांला हेच महाशय जाब विचारतात आणि त्यांनी स्वत: मात्र याच मुलांचे चित्रीकरण कसे काय केले, अशी विचारणा शिपूरकर यांनी केली. बाल न्याय अधिनियम ७४ अन्वये हा गुन्हा असून, आम्ही तसा गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर