शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा अभिनव उपक्रम : काका, काकू... आपण कसे आहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 11:05 IST

Police Kolhapur : काका, काकू, आपण कसे आहेत... आपली तब्येत कशी आहे..., काही अडचण आहे का...? असा आदराने विचारपूस करणारा, भावनेला हात घालणारा संवाद फोनद्वारे कानी पडल्याने ज्येष्ठ नागरिकही सुखावले. कोरोनामुळे घरात कोंडून घेण्याची वेळ आलेल्यांना आपुलकीचा आधार देणारे फोन जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून जात आहेत. या अभिनव उपक्रमामुळे कोरोनामुळे जीव मुठीत धरून बसलेल्या वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हस्य उमटले.

ठळक मुद्देपोलिसांचा अभिनव उपक्रम : काका, काकू... आपण कसे आहातजुना राजवाडा पोलिसांचा ज्येष्ठांशी संवाद; कोरोनात दिला विश्वास

कोल्हापूर : काका, काकू, आपण कसे आहेत... आपली तब्येत कशी आहे..., काही अडचण आहे का...? असा आदराने विचारपूस करणारा, भावनेला हात घालणारा संवाद फोनद्वारे कानी पडल्याने ज्येष्ठ नागरिकही सुखावले. कोरोनामुळे घरात कोंडून घेण्याची वेळ आलेल्यांना आपुलकीचा आधार देणारे फोन जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून जात आहेत. या अभिनव उपक्रमामुळे कोरोनामुळे जीव मुठीत धरून बसलेल्या वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हस्य उमटले.वयोवृद्ध व्यक्ती म्हटले की, त्यांना ऐकायला कमी येते, डोळ्याने कमी दिसते, अशा अवस्थेत अनेक जण त्यांची जागा अडगळीतच समजतात. युवा पिढीचा तर त्यांच्याशी संवाद संपलेलाच आहे. वृद्धापकाळाचे जीवन जगणाऱ्यांना आपुलकीचे दोन शब्दच पुरेसे असतात. त्यातच कोरोनाची भीती त्यांच्या मनात घर करून बसली. नकारात्मक माहिती वारंवार ऐकून, वाचून ते तणावात आहेत.

अशा भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ज्येष्ठांची परवड होऊ नये या उद्देशाने त्यांना आपुलकी दाखवणारा उपक्रम जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सुरू केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ७३ ज्येष्ठ नागरिक आहेत. रविवारपासून त्यांना दिलासा देणारा हा उपक्रम सुरू झाला आहे.त्यांना पोलीस ठाण्यातून चौकशी करणारा, गोड शब्दात संवाद साधणारा, आपुलकीने तब्येतीची विचारपूस करणारा फोन जात आहे. त्यातून काळजी करू नका, वेळेत उपचार घेतल्याने कोरोना बरा होतोच. त्यामुळे घाबरून जाऊ नका, कोणत्याही वेळी मदतीसाठी आम्हाला ११२ नंबरला फोन करा, पोलीस आपल्याला सहकार्य करतील, असा विश्वास दिला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे चेहरे फुलले आहेत.

घरचे काळजी घेतातच; पण बाहेरही कोणी तरी आपले काळजी करणारे आहे, असे वाटले. पोलीस ठाण्यातून फोन आल्यानंतर हायसे वाटले.-आनंद इनामदार,साळोखेनगर, कोल्हापूर

पोलीसही आमच्यासारख्या वृद्धांची चौकशी करतात, ऐकून समाधान वाटले. हेल्प पाहिजे का? अडचणी आहेत का? अशी विचारपूस करताना बरे वाटले.-बापूसाहेब भोसले,शिवाजी पेठ, कोल्हापूर.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर