शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

शिवाजी विद्यापीठात नवसंशोधनाचे आविष्कार; विविध प्रकल्पांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:07 IST

शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात नवसंशोधनाचे आविष्कार; विविध प्रकल्पांचे सादरीकरणचष्म्यांद्वारे चालणारा स्पेक्टॅकल्स् माऊस, सडक बिजली जनरेटर

कोल्हापूर : दिव्यांग विद्यार्थी, व्यक्तींसाठी चष्म्यांद्वारे संगणकासाठी वापरता येणारा स्पेक्टॅकल्स् माऊस, स्मार्ट ब्लार्इंड स्टिक, गतीरोधक आणि वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यावर वीजनिर्मिती करणारा सडक बिजली जनरेटर, असे विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सव. या महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध प्रकल्प सादर केले.या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधला. तज्ञांनी प्रकल्पांचे परीक्षण केले.

या महोत्सवात विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अमोल माळी याने अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापरातून दिव्यांगांसाठी तयार केलेली स्मार्ट ब्लार्इंड स्टीक सादर केली. ओमकार साळुंखे याने डोळे आणि डोक्याच्या हालचालीद्वारे वापरता येणारा संगणकाचा माऊसचे संशोधन मांडले. घरातील पाणीसाठ्याची माहिती देणारी वायरलेस यंत्रणेचे उपकरणे पांडुरंग गायकवाडने सादर केले.

प्राणीशास्त्र विभागातील योगेश माने याने साप पकडण्यासाठीच्या पर्यावरपूरक स्टिकचे संशोधन मांडले. कराडच्या एसजीएम कॉलेजच्या प्रतिक्षा यादव हिने ब्ल्यूटूथद्वारे तापमान, आर्द्रता जाणून घेणारा प्रकल्प सादर केला.

साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शाम बंडगरने सडक बिजली जनरेटर, तर पल्लवी दिक्षे हिने विद्यार्थी अभिरूची संशोधन मांडले. या महोत्सवात मानव्यशास्त्र, वाणिज्य, मूलभूत विज्ञान, शेती व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र प्रकारातील या महोत्सवात दोनशे पदव्युत्तर संशोधक, शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले. त्यांची उपकरणे, प्रकल्प पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

आपल्या विषयाशी निगडित प्रकल्पांची माहिती बारकाईने घेत होते. दरम्यान, पदवी आणि पदव्युत्तर गटातील विजेत्यांची अंतिम स्पर्धा दि. ४ जानेवारीला विद्यापीठात होणार असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले.भित्तीपत्रकातून अभ्यासपूर्ण मांडणीया महोत्सवातील अधिकतर स्पर्धकांनी भित्तीचित्रांचे सादरीकरण केले. त्यात इस्लामपूर शहरातील ई-शॉपिंग, भारतातील ग्रामीण उद्योगांच्या समस्या व उपाययोजना, उचगावमधील पारधी समाजाची भाषा, बाबंूपासून विविध वस्तू करणाऱ्या बुरूड समाजाची स्थिती, दुष्काळी भागातील महिला उद्योगांसमोरील समस्या, भाषिक उपाययोजनांची क्षेत्रे व मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी, फौंड्री उद्योगातील कामगारांची स्थिती आदी विषयांची अभ्यासपूर्ण मांडली केली. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर