शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या

By उद्धव गोडसे | Updated: April 3, 2023 18:10 IST

समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते.

कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये केलेल्या मृतदेहाच्या पंचनाम्यादरम्यान पानसरे यांच्या अंगावर जखमा आढळल्या, अशी साक्ष पंच साक्षीदार विजयकुमार धोंडू नार्वेकर (वय ६७, रा. महालक्ष्मी मंदिर कम्पाऊंड, मुंबई) यांनी दिली. तसेच जखमी पानसरे यांना रुग्णालयात दाखल करणारे मुकुंद कदम यांची रक्ताच्या डागाची कपडे पंच साक्षीदार सुनील शिवाजीराव जाधव (वय ४९, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी न्यायालयात ओळखले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर आज, सोमवारी (दि. ३) सुनावणी झाली. पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात सोमवारी दोन पंच साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये २१ फेब्रुवारी २०१५ मध्ये पहाटेच्या सुमारास पानसरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळचे पंच विजयकुमार नार्वेकर यांची साक्ष विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी नोंदवली. पानसरे यांच्या मृतदेहाच्या छातीवर, डाव्या काखेखाली आणि मानेवर जखमा होत्या, तसेच डाव्या दंडावर आणि उजव्या गुडघ्याजवळही जखमा होत्या, अशी साक्ष नार्वेकर यांनी दिली.जखमी अवस्थेतील पानसरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणारे मुकुंद कदम यांची रक्ताने माखलेली कपडे जप्त करून पोलिसांनी पंचनामा केला होता. त्यावेळचे पंच सुनील जाधव यांचीही साक्ष झाली. औषध वितरक कंपनीत काम करणारे जाधव यांना पोलिसांनी कपडे जप्तीचा पंच बनण्याची विनंती केल्याने ते पंचनाम्यासाठी हजर होते. तेव्हा पोलिसांनी दाखवलेल्या कदम यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, अशी साक्ष जाधव यांनी दिली.बचाव पक्षामार्फत ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. प्रवीण करोशी आणि ॲड. समीर पटवर्धन यांनी पंच साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. पंचनाम्यातील वर्णण आणि न्यायालयातील साक्ष यामध्ये विसंगती असल्याचा मुद्दा न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय