शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2025 12:16 IST

इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

समीर देशपांडेकोल्हापूर : प्रचंड पाण्याचा उपसा, तितकीच प्रचंड वीजबिले, मोठी गळती आणि इतके करूनही अशुद्ध आणि अपुऱ्या पाण्याचा पुरवठा. राज्यातील हे पाणीपुरवठा विषयक चित्र बदलण्यासाठी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कंबर कसली आहे. ‘आयओटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता एखाद्या गावाने नदीतून पाणी उचलले किती आणि गावातील शेवटच्या ग्रामस्थाला ते मिळाले की नाही, इथपर्यंतची माहिती आता संकलित करण्यात येणार आहे.२०१९ साली जाहीर करण्यात आलेल्या जलजीवन मिशनमधील योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. माणसी प्रतिदिनी ५५ लिटर शुद्ध पाण्याचे उद्दिष्ट ठेवून या जलजीवनच्या नव्या योजना आखण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक ठिकाणी दर्जाहीन कामांमुळे गळती मोठ्या प्रमाणावर सुरू राहते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजना १०० टक्के फलद्रूप ठरत नाहीत, म्हणूनच आता गावागावातील पाण्याचा हिशाेब मांडला जाणार आहे.इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदतइंटरनेटच्या माध्यमातून मोठी संख्यात्मक माहिती इतर घटकांना पाठवण्यासाठीच्या तंत्रज्ञान पद्धतीने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हटले जाते. याच माध्यमातून आता एखाद्या पाणी योजनेतून गावासाठी नदीतून नेमके किती पाणी उचलले हे फ्लो मीटरच्या साहाय्याने मोजण्यात येईल. त्यातील किती पाणी वाहून नेऊन गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पडले, तेथून ते सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे समान प्रमाणात वितरित झाले की नाही, याची संपूर्ण माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे.

पाण्याची शुद्धता ही कळणारही माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण केले असताना, पाण्याची शुद्धता, त्यामध्ये टीसीएलचा वापर किती यांसह पाण्याला येणारा वास या गोष्टींचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असेल, तर ते थांबवणे शक्य होणार आहे. यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, विविध सिग्नल्सच्या माध्यमातून पाण्याच्या वितरणाचे आणि दर्जाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. उचलले तितकेच पाणी गावात पोहोचले नसेल, तर नेमका पाण्याचा अपव्यव कुठे होतो, हेदेखील या माध्यमातून समजणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी