शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात होणार एन.सी.सी विमान प्रशिक्षण केंद्र, मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:17 IST

एन.सी.सी.च्या वायुसेना विभागातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून, सध्या हे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र केंद्र नाही. कोल्हापूरमधील उजळाईवाडी येथील विमानतळावर वायू विभागात असणाऱ्या छात्रांसाठी विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती अ‍ॅडशिनल डायरेक्टर जनरल महाराष्ट्र राज्य एन. सी. सी.चे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापुरात होणार एन.सी.सी विमान प्रशिक्षण केंद्रमेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांची माहिती; प्रस्ताव राज्य शासनाकडे

कोल्हापूर : एन.सी.सी.च्या वायुसेना विभागातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून, सध्या हे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र केंद्र नाही. कोल्हापूरमधील उजळाईवाडी येथील विमानतळावर वायू विभागात असणाऱ्या छात्रांसाठी विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती अ‍ॅडशिनल डायरेक्टर जनरल महाराष्ट्र राज्य एन. सी. सी.चे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी दिली.एन.सी.सी. भवन येथे अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसाद म्हणाले, राज्यातील हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून, या ठिकाणी सहा व्हायरस एअरक्राफ्ट प्रकारातील विमाने प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एन. सी. सी.मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासोबतच त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. छात्रांसाठी दर्जेदार गणवेश देण्यासाठी आम्ही टेंडर काढले आहे. लवकरच त्यांना गणवेशही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ग्रुप कमांडर एन. सी. सी. ब्रिगेडियर आर. बी. डोग्रा, ५ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. कोल्हापूरचे कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर