शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची माहिती ‘लोड’: कर्जमाफीच्या याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:41 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्यात गेले दोन-तीन दिवस त्रुटीचा गोंधळ उडाल्याने संथगतीने काम सुरू होते.

ठळक मुद्देसॉफ्टवेअरमधील बदलाने गती; दोन दिवस कामदोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंंबर कसली आहे.

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्यात गेले दोन-तीन दिवस त्रुटीचा गोंधळ उडाल्याने संथगतीने काम सुरू होते. सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने त्रुटी पटकन सापडत असल्याने कामास गती आली आहे. सोमवारअखेर ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती अपलोड केली. अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरायची असून, दोन दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे.

कर्जमाफीत सहभागी झालेल्या शेतकºयांची माहिती भरण्याचे काम गेले पंधरा दिवस जिल्हा बँकेत सुरू आहे. राज्याच्या आयटी विभागाकडून रोज एक कॉलम बदलून येतो, तशी माहिती भरली तर त्यात त्रुटी दाखविल्या जात असल्याने सहकार विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकांचे काम पूर्ण झाले, कोल्हापूर जिल्हा मागे राहिल्याने सहकार यंत्रणावर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व त्यांची टीम बँकेत तळ ठोकून आहे. विकास संस्थांची संख्या जास्त असल्याने कामाचा निपटारा होत नसल्याने पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकेतील आयटी विभागातील अधिकारी सोमवारी दाखल झाले.

जिल्ह्यातील १८५४ विकास संस्थांपैकी ५१८ संस्थांतील ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती भरली आहे. अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरायची आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंंबर कसली आहे.

आठशे पदाधिकाºयांचीमाहिती मिळेनासहकारी संस्थांच्या पदाधिकारी, त्यांची आई व जन्मठिकाणाची माहिती सरकारने मागवली आहे. ‘गोकुळ’ अंतर्गत ३५०, तर जिल्हा बँकेचे अंतर्गत ४५० अशा आठशे पदाधिकाºयांची माहिती अद्याप सहकार विभागाला मिळालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून माहितीबाबत दबाव असल्याने सोमवारी जिल्हा बँक व दुग्ध अधिकाºयांना फैलावर घेतले.बँक व सहकार विभागात ताणाताणीसहकार विभागाने अधिकाºयांची संख्या वाढवून कामाचा निपटारा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी संगणकाची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा बँकेला दिली होती; पण सोमवारी रात्रीपर्यंत संगणक न मिळाल्याने अधिकारी दिवसभर बसून राहिल्याने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे संतप्त झाले. त्यांनी बँकेच्या अधिकाºयांना चांगलेच सुनावले.सहकार यंत्रणेवर ताणसोमवारअखेर ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती अपलोड केली.अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरावयाचीकोल्हापूर जिल्हा मागे राहिल्याने सहकार यंत्रणावर कमालीचा ताण