शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांच्या त्रुटींमुळे मतदार अर्ज अपात्र

By admin | Updated: September 12, 2016 00:48 IST

पालिका निवडणुकीची तयारी : सर्वाधिक फटका जयसिंगपुरातील मतदारांना

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूर जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ३५०० हून अधिक नव्याने मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जातील कागदपत्रांच्या विविध त्रुटींमुळे सुमारे ५०० हून अधिक नोंदणी अर्जदारांना येत्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. अपात्र ठरलेले सर्वाधिक मतदार जयसिंगपुरातील आहेत. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदविण्याची मुदत ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत होती. जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. त्यासाठी शासनाने प्रत्येक गावात केंद्र सुरू केले होते. १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पात्र केलेल्या नागरिकांनी ३१ आॅगस्ट २०१६ अखेर मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक होते. मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात बदल असल्यास फॉर्म नं. ८, नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं.६, तसेच मतदार यादीतून नाव वगळणे याकरिता फॉर्म नं.७ चा वापर करावा. याचबरोबर जयसिंगपूर व कुरुंदवाडमधील सर्वच मतदान केंद्रांवर बीएलओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे नाव नोंदणीचे काम होते. दोन्ही नगरपालिकांच्या क्षेत्रात जवळपास ३५०० हून अधिक जणांनी नमुना ६ अंतर्गत नव्याने मतदार म्हणून अर्ज दिले होते. नाव नोंदणी करीत असताना नावाचा कागदोपत्री पुरावा, वयाचा पुरावा, निवासाचे ठिकाण, तसेच नाव अन्य कोणत्याही मतदार संघात असल्यास भाग ४ नुसार प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. काही अर्जदारांनी आधारकार्ड देखील जोडले आहेत. दरम्यान, जवळपास ५०० हून अधिक जणांनी अपुऱ्या माहितीआधारे अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे या नवीन मतदारांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत अपुरी माहिती जोडल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहेत. याबाबतची माहिती नगरपालिकांना कळविण्यात आली आहे, असे निवडणूक नायब तहसीलदार संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. जबाबदार कोण? मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत संबंधित बीएलओ अधिकारी कामासंबंधी टाळाटाळ करीत असतील तर नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले होते. अर्जासोबत अपुरी माहितीची छाननी झाल्यानंतर संबंधित अर्जदारांना कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न अर्जदारांतून उपस्थित केला जात आहे.