शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग, व्यापाराला ‘जीएसटी’चा बुस्टर काही लागू पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली परिसरात पुरामुळे हाहाकार माजला. साहजिकच या परिसरातील उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे काही काळ ...

ठळक मुद्देउद्योग, व्यापाराला ‘जीएसटी’चा बुस्टर काही लागू पडेनामजुरीवर काम करणाऱ्या उद्योगावरील जीएसटी १८ वरून १२ वर

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली परिसरात पुरामुळे हाहाकार माजला. साहजिकच या परिसरातील उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे काही काळ मंदीला सामोरे जावे लागत आहे. सरकारनेही मजुरीवर काम करणाऱ्या उद्योगांचा जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला आहे. मात्र, हा ‘बुस्टर पूर’ मंदीच्या सावटामुळे काही केल्या लागू पडेनासा झाला आहे. यासाठी ठोस मदतीची अपेक्षा उद्योग, व्यापारजगतातून केली जात आहे.कोल्हापुरात शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, पांजरपोळ औद्योगिक वसाहत, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-पंचतारांकित, हातकणंगले, जयसिंगपूर, आदी ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी देशासह परदेशांतील दुचाकी, चारचाकी, तीनचाकी गाड्या बनविणाऱ्या कंपन्यांना स्पेअर पार्ट बनवून देण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून केले जात आहे.

यात मुख्य कंपनीकडून स्पेअर पार्ट पुरविण्यासाठी ठेका घेणारा मुख्य ठेकेदार, त्यानंतर सबठेकेदार आणि त्यानंतर छोटे कारखानदार अशा साखळी पद्धतीने काम या ठिकाणी चालते. त्यात वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी आगाऊ माल बनवून घेतल्याने यापुढील माल बनवून घेणे बंद केले. त्याचा थेट परिणाम या औद्योगिक वसाहतींवर झाला. परिणाम स्वरूप कामाचे दिवस कमी होण्यात झाला.आठवड्यातील सहा दिवसांपैकी तीन दिवसच कारखाने सुरू होण्यात झाला आहे. त्यामुळे एकूणच मंदीची लाट या परिसरात आहे. सरकारने मजुरीवर काम करणाऱ्या उद्योगांवरील १८ टक्के जीएसटी १२ टक्केइतका कमी केला आहे. मात्र, हाताला कामच नसल्याने या जीएसटीचा दर कमी करण्याचा काडीचाही फायदा या छोट्या उद्योजकांना झालेला नाही. यासाठी सरकारने वेगळ्या प्रकारे मदत देऊन पुन्हा एकदा उद्योग, व्यापाराला उभारी देण्याची गरज आहे.

जीएसटीचे दर केवळ मजुरीवर काम करणाऱ्या उद्योगांना दिले आहेत. उत्पादन करणाºया उद्योगांना त्याचा काडीचाही लाभ नाही. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.- प्रमोद पाटील, उद्योजक, कागल पंचतारांकित वसाहत.

उत्पादक, विक्रेत्यांना जीएसटीचे दर ‘जैसे थे’च आहेत. मजुरीवर काम करणाऱ्या उद्योगांना १८ वरून १२ टक्के जीएसटीचे दर केले आहेत. सद्य:परिस्थितीत येथील उद्योजक, व्यापाऱ्यांना मंदीसह पुरालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दर कमी करण्याचा काहीच फायदा झाला नाही.- सुधीर अग्निहोत्री, कर सल्लागार. 

 

टॅग्स :GSTजीएसटीkolhapurकोल्हापूर