शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

उद्योग, व्यवसायाला सुमारे ११०० कोटींचा फटका; सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:43 IST

पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील महापुराचा तडाखा-

संतोष मिठारी।कोल्हापूर : येथील महापुरामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रांतील आठ दिवसांतील सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली; त्यामुळे सुमारे ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये सोमवार (दि. ५) पासून महापुराचे पाणी वाढू लागले. त्याची तीव्रता दुसऱ्या दिवसापासून वाढली. ग्रामीण आणि शहरी भागात विविध ठिकाणी पुराचे पाणी घुसले. मार्ग बंद राहिले. त्याचा परिणाम शहरातील व्यापार, व्यवसायावर झाला. पुरामुळे गेल्या आठ दिवसांतील सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. शहरात अन्नधान्य, तेल, तयार कपडे, वाहनांचे सुट्टे भाग, आदी क्षेत्रांतील १५ हजारांहून अधिक व्यापारी, व्यावसायिक आहेत. उलाढाल थांबल्याने त्यांना ३00 कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना सोमवारी सुट्टी असते. शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, हातकणंगले-कागल या मोठ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योग एकमेकांशी निगडीत आहेत. या उद्योगांचे काम एकमेकांवर अवलंबून आहे.

तब्बल पाच दिवस पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने कच्चा माल, विविध प्रक्रियेसाठी सुट्ट्या भागांची वाहतूक करता आली नाही; त्यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत ९० टक्के, तर गोकुळ शिरगाव आणि हातकणंगले-कागल औद्योगिक वसाहतीतील काम ६० ते ७० टक्क्यांपर्यंत बंद राहिले. बंद झालेले रस्ते आणि इंधन पुरवठा होत नसल्याने कामगारदेखील कंपन्यांमध्ये कामावर येऊ शकले नाहीत. या सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये रोज सरासरी ५00 कोटींची उलाढाल होते. महापुरामुळे सहा दिवसांतील तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. पुणे, मुंबईसह देशातील अन्य कंपन्यांसमवेत त्यांच्या करारानुसार उत्पादने पुरविता आली नाहीत; त्यामुळे सुमारे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शिरल्याने वर्कशॉप आणि अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मंदीची स्थिती असताना त्यात महापुराने तडाखा दिल्याने झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांतून होत आहे.इंधन नसल्याचाही फटकामहामार्ग बंद राहिल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात इंधन उपलब्ध झाले नाही; त्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू राहिली नाही. त्याचा परिणाम कामगारांची उपस्थिती, पाणी नसलेल्या ठिकाणाच्या कंपन्यांमध्ये उत्पादने नेण्यावर झाला. 

आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्ह्यातील उद्योगांची संख्या : २० हजारशहरातील व्यापारी, व्यावसायिकांची संख्या : सुमारे १५ हजार 

कोल्हापूर शहरातील लहान-मोठ्या १५ हजार व्यापारी, व्यावसायिकांची गेल्या आठ दिवसांतील सुमारे ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. हे सर्वजण ५ ते १० टक्के मार्जिनमध्ये व्यवसाय, व्यापार करतात. त्यांचे ३00 कोटींचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्याने दुकानांचे झालेले नुकसान वेगळे आहे. त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासात योगदान देणाºया उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना सरकारने मदत करावी.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजवीजेचे सर्वाधिक दर आणि मंदीच्या स्थितीत टिकून राहण्यासाठी कोल्हापूरचे औद्योगिक क्षेत्र संघर्ष करत आहे. त्यातच आता महापुराचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे साधारणत: ८०० कोटींचे नुकसान झाले. ते लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत द्यावी.- राजू पाटील, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी