शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्र, शिक्षण संस्थांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:54 IST

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या ...

कसबा बावडा : औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान उद्योजकांना मिळेल आणि विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अनुभव मिळेल. यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थी या दोघांचा फायदा होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.शिक्षण संस्था आणि उद्योजक यांच्यात आंतरक्रिया व्हावी तसेच या दोहोंच्यात माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले होते. याचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून झाले. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील एक चांगली संधी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इन्ट्रॅक्शनमधून निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातला चांगला अनुभवही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी चांगले करिअर करू शकतील.यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, सध्या औद्योगिक क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कुशल मनुष्यबळ मिळत नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. योग्य तांत्रिक ज्ञान उपलब्ध होत नाही. अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाहीत. अभ्यासक्रमात गॅप असतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले ज्ञान मिळत नाही. विद्यार्थी लाईव्ह प्रोजेक्ट करत नाहीत. कामाच्या अनुभवाची कमतरता, पायाभूत सुविधांची कमतरता असते. यासाठी उद्योजक, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले पाहिजेत. या उद्देशानेच या इंडस्ट्री इन्स्टिट्यूूट इन्ट्रॅक्शन २०१८ चे आयोजन केले आहे.यावेळी गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंह पवार यांनी, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असते. अनेक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळत नाही. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपमुळे या माध्यमातून उद्योग क्षेत्राला उपयुक्त असलेले कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.यावेळी फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी, कारखानदारांना आधुनिक ज्ञानाची गरज आहे. ती डी. वाय. पाटील ग्रुपकडून नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्योजक सचिन मेनन, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, उद्योजक अजयसिंह देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सचिन मेनन, राजीव पारीख, श्रीकांत दुधाणे, आदी उपस्थित होते.