शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 14:11 IST

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

इंदुमती गणेशकोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.भारताचे नंदनवन असलेले काश्मीर एकदा तरी पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे मार्च ते जुलै या कालावधीत विविध टुर कंपन्यांकडून काश्मीर सहली काढल्या जातात. कोल्हापुरातून वर्षाकाठी जवळपास १० ते १५ नागरिक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. त्यांचे बुकिंग सहा महिने आधीच झालेले असते.

यंदाच्या वर्षीची सहल २० मार्चपासून सुरू होणार होती. मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला, त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या युद्धजन्य व तणावपूर्ण स्थितीमुळे टूर कंपन्यांनी हा दौरा रद्द केला आहे. शिवाय काश्मीरला काही कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी तेथे जाणाऱ्या विमानांचे तिकीट रद्द केले आहे.काश्मीरचे अर्थकारण मुख्यत: पर्यटनावर चालते; त्यामुळे तेथील सरकारकडूनही पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र भारताचे स्वर्ग असलेले हे राज्य सध्या सर्र्वांत संवेदनशील बनले आहे. जवानांवरील हल्ल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत; शिवाय मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या दोन्ही कारणांमुळे काश्मीरचा ठरलेला दौरा रद्द करण्यात आला आहे.

दुबईहून पुढचा प्रवासया तणावपूर्ण स्थितीमुळे भारतातून अन्य देशांना जाणाऱ्या विमानांचा मार्ग वळविण्यात आला आहे. युरोप, लंडन, स्पेनसारख्या अनेक देशांमध्ये ही विमाने पाकिस्तानमधून जातात. आता मात्र ही विमाने पाकिस्तानऐवजी दुबईमार्गे वळविण्यात आली आहे.

शुल्क रद्दची मागणीकाश्मीरमधील सध्याच्या वातावरणामुळे देशभरातील नागरिकांकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात विमानांची तिकिटे रद्द केली जात आहेत. काश्मीरमध्येच नव्हे तर अन्य देशांत जाणाऱ्या नागरिकांनीही आपला दौरा थांबविला आहे. मात्र बुकिंग केलेले तिकीट रद्द करताना शुल्क आकारले जाते. ही रक्कम तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत असते. ट्रॅव्हल एजंट इंडिया असोसिएशनने विमान कंपन्यांकडे सद्य:स्थितीत हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

काश्मीरचे सौंदर्य आणि बर्फ पाहण्यासाठी नागरिक तेथे जातात. सध्याच्या स्थितीत हे शक्य नसल्याने कोल्हापुरातील टूर कंपन्यांनी काश्मीरचा दौरा रद्द केला आहे. वातावरण निवळल्यानंतर पुन्हा सहली सुरू होतील.- बी. व्ही. वराडे, ट्रेड विंग्ज 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन