शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

योग, गुरुपरंपरा, मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

विजय भटकर : भारतीय संस्कृती महोत्सवात चौथ्या दिवशीही मोठी गर्दी;

कोल्हापूर : योग, गुरुपरंपरा आणि मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत आहे. संस्कृती आपल्याला प्रेरणा देण्यास शिकविते. ही संस्कृती आणि युवापिढीच्या ताकदीवर आपला देश विश्वगुरू बनणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज, गुरुवारी येथे केले. विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती पाहण्यासाठी कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर सलग चौथ्या दिवशी भाविक, नागरिकांची गर्दी कायम राहिली.भारतीय संस्कृती उत्सवातील युवाज्ञानोत्सवात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात राजश्री चौधरी, नोबेल पुरस्कार विजेते डॉ. महादेव तलवार, गोव्याचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, ‘बॉर्डरलेस’चे अधिक कदम, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी, ओडिसातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहित प्रमुख उपस्थित होते.रामदेवबाबा म्हणाले, डॉक्टरकी तसेच अन्य स्वरूपांतील पदव्या सहजासहजी मिळत आहेत. अशी पदवी मिळत असली तरी त्यामुळे शिक्षण आणि संस्कृती कमी होत आहे. देशाला बलवान बनविण्यासाठी संस्कारपूर्ण शिक्षणाची गरज आहे. ‘कोणतीही गोष्ट एकदा करून बघितलीच पाहिजे’ हा आजच्या युवापिढीला ‘व्हायरस’ लागला आहे. (प्रतिनिधी)कोण काय म्हणाले...

संस्कारक्षम शिक्षणाची गरज : रामदेवबाबाराजश्री चौधरी : युवकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासह सुदृढ भारत घडविण्यासाठी नेताजी बोस यांनी निश्चित केलेल्या धोरणांची फाईल सरकारकडे अडकून आहे. ती खुली करण्यात यावी. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारी ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धा बंद व्हावी.गुरुराज करजगी : जे बोलतो तेच करण्याची पद्धती शिक्षणात यावी. पुस्तकी ज्ञानाऐवजी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे उपयुक्त ठरणारे आहे.प्रदीप पुरोहित : राष्ट्रउभारणी हे विद्यार्थ्यांचे लक्ष्य असावे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकार न्याय देत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा स्थितीत युवकांनी संघटितपणे राष्ट्र उभारणी, समाजप्रबोधनाचे काम करावे.डॉ. तलवार : राष्ट्र उभारणीत युवकांनी ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा.अधिक कदम : देशाच्या ‘बॉर्डर’ सुरक्षित नाहीत. तेथील जमिनी आपण मिळविल्या; पण लोक अजूनही आपल्यापासून दूर आहेत. त्यांना प्रेमाने आपलेसे केले पाहिजे. देशातील युवक काम करायला तयार आहेत; पण त्यांना साथ मिळत नसल्याचे वास्तव आहे.