शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र, कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:09 IST

कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्र, कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावेसंजय मंडलिक यांची मागणी; पंतप्रधानांची घेतली भेट

कोल्हापूर : कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली.कोल्हापूरलगतच्या कोकणपट्ट्यातही भातशेती मोठ्या प्रमाणात पिकविली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसशेती भरपूर असून पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या लक्षणीय आहे. हा भाग दुर्गम व डोंगरी असून याठिकाणी शेती पदवीधारक विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

त्याठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ झाल्यास विद्यापीठांतर्गत पिकांच्या नवीन दर्जेदार प्रजाती व वाणांचा अभ्यास करता येईल. या पार्श्वभूमीवर, पश्चिम महाराष्ट्र व कोकणकरिता एक नवीन कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केली. शिवसेना संसदीय गटनेते खासदार विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.

पुनर्वसनासाठी जास्त निधी द्यावातिवरे धरण फुटल्यानंतर वाहून गेलेल्या नागरिकांना आणि तिवरे ग्रामस्थांना पंतप्रधान साहाय्यता निधीअंतर्गत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी खासदार मंडलिक आणि खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

 

 

टॅग्स :Sanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूर