शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

कृष्णा, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST

धरण क्षेत्रातील पावसाचा परिणाम : शाहूवाडीतील पाच बंधारे पाण्याखाली; अणुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद

जयसिंगपूर : धरणक्षेत्रात कोसळत असलेला धुवाधार पाऊस व तालुक्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत दहा फुटाने, तर पंचगंगेच्या पाणीपातळीत सात फुटाने वाढ झाली आहे. अलमट्टी धरणात येणारे पाणी आणि होणारा विसर्ग याकडे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह, दुधगंगा, पंचगंगा, वारणा, आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गुरुवारी उदगाव-अंकली पुलावर कृष्णेची पाणीपातळी २७.११ फूट, कुरुंदवाड दिनकरराव यादव पुलाजवळ पंचगंगेची पाणीपातळी ४८.०३ फूट, तर राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणीपातळी ३५.०६ फूट होती. गुरुवारी दिवसभर हलका पाऊस झाला. पुराचे पाणी वाढत असले, तरी आलमट्टी धरणातील पाण्याबाबत प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. कनवाड बंधारा पाण्याखालीअर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कनवाड-म्हैसाळ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. परिणामी, खासगीसह शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या पावसामुळे अर्जुनवाड,या नदीकाठच्या भागात वीटभट्टीसाठी माती उपसा करण्यात आली आहे. यामुळे मळीची माती मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. येथील अरविंद चौगुले यांच्या पोटमळीत जल आयोग केंद्राद्वारे पाच आर.सी.सी.पोल उभे केले होते; परंतु चौगुले यांची मळी पुरात वाहून गेल्याने खांबही पुरात वाहून गेले आहेत. शाळी नदीला पूरमलकापूर : मलकापूर परिसरात गेली चार दिवस पावसाची संततधार सुरू आहे. शाळी नदीला आलेल्या पुरामुळे शाहूवाडी-कोळगाव रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे, तर कडवी नदीला आलेल्या पुरामुळे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कडवी नदीवरील पेरीड- कोपार्डे, शिरगाव, सौते- सावर्डे, पाटणे व बर्की बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडी-कोळगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने अणुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. इचलकरंजीत जुना पूल वाहतुकीस बंदइचलकरंजी : शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी दिवसभरामध्ये तीन फूट वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या पुलावर दीड फूट पाणी आल्यामुळे तो बुधवारी (दि. ३) मध्यरात्रीपासून बंद असेल.चंदगडमधील नऊ बंधारे पाण्याखालीचंदगड : चंदगडला गुरुवारी तिसऱ्या दिवशी पाऊस कमी झाला असला, तरी तालुक्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, गवसे, इब्राहिमपूर, कानडी, सावर्डे व अडकूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड येथील ताम्रपर्णी नदीवरील पुलावर पाणी आल्याने हेरे, तिलारी, पारगड मार्ग बंद होता.कोवाड येथील रघुनाथ दत्तू निट्टूरकर यांच्या घराची पडझड होऊन १५ हजारांचे नुकसान झाले. सुपे येथील राधाबाई कृष्णा पाटील यांच्या घराची पडझड होऊन दहा हजारांचे नुकसान झाले व लक्ष्मण पुंडलिक बिजगर्णीकर यांच्या घराची किरकोळ पडझड होऊन आठ हजारांचे नुकसान झाले. मुरकुटवाडी येथील पांडुरंग भैरू पवार यांच्या घराची भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले. तसेच आप्पाजी भैरू सुभेदार यांच्याही घराची भिंत कोसळून १५ हजारांचे नुकसान झाले.नागरदळे येथील शकुंतला सुरेश कोकितकर यांच्या घराची भिंत कोसळून २४ हजारांचे नुकसान झाले. पोरेवाडी येथील उत्तम गोविंद पाटील यांची विहीर कोसळून २० हजारांचे नुकसान, दुंडगे येथील नागोजी महादेव नाईक यांची घराची भिंत कोसळून २५ हजारांचे नुकसान झाले.साळगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखालीपेरणोली : साळगाव (ता. आजरा) येथील बंधारा मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. बंधारा पाण्याखाली गेल्याने आजरा-पेरणोली मार्गावरील वाहतूक ठप्प असून, पर्यायी सोहाळे मार्गे वाहतूक सुरू आहे.