शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढते अंतर चिंताजनक

By admin | Updated: May 5, 2017 00:11 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात मिश्रा यांना ‘धन्वंतरी’ पुरस्कार प्रदान

इस्लामपूर : समाजामध्ये डॉक्टर व रूग्णांमधील अंतर वाढत आहे, ही चितेंची बाब आहे़ थोर धन्वंतरी डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांच्यासारख्या धन्वंतरींची तत्त्वे व आदर्शातून डॉक्टर व रूग्णांमधील हे अंतर कमी होऊ शकते, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. खून, मारामाऱ्यांमध्ये रस असणाऱ्या वाळवा तालुक्यातील लोक आता आपली मुले डॉक्टर, अभियंते, अधिकारी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहून समाधान वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.येथील राजारामबापू नाट्यगृहामध्ये डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना आ़ पाटील यांच्याहस्ते ‘धन्वंतरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संजय साळुंखे, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, सभापती सचिन हुलवान, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ़ बाळासाहेब नेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ़ संजय साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी लिंबाजी पाटील, रणजित पाटील, अ‍ॅड़ बी़ डी़ पाटील, ए़ वाय़ क्षीरसागर, धोंडीराम जाधव, मंगला नेर्लेकर, डॉ़ एऩ टी़ घट्टे उपस्थित होते़ प्रा़ राजा म्हाळगी यांनी मानपत्र वाचन केले़ अनिल खटावकर यांनी सूत्रसंचालन केले़ एस. एऩ पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)अध्यात्म-विज्ञान पूरक : वेदप्रकाश मिश्रा डॉ़ वेदप्रकाश मिश्रा यांचे ‘स्वामी विवेकानंद-एक अद्भूत आध्यात्मिक व वैज्ञानिक’ या विषयावर व्याख्यान झाले़ ते म्हणाले की, अध्यात्म व विज्ञान एकमेकांना पूरक आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. अध्यात्म म्हणजे स्वत:ची ओळख करून घेणे़ आपण आपल्याबद्दल सांगतो एक, असतो दुसरेच आणि असायला हवे वाटते ते असते तिसरेच़ याबद्दल चिंतन व्हायला हवे़ डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांची परंपरा व आदर्शांचे पालन करीत वैद्यकीय क्षेत्रात अधिक योगदान देऊ.