जयसिंगपूर : वातावरणातील बदलाने ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. वातावरणातील बदल लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून, सोशल डिस्टंन्सिंग ठेवावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
--------------
उघड्यावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी
शिरोळ : शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत असल्यातरी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा पडणाऱ्या परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेने शहरात कचऱ्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.
---------------------
जयसिंगपूर ठाण्यातील वाहने हलविली
जयसिंगपूर : विविध प्रकरणांमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारातच लावण्यात आल्यामुळे विद्रूप चित्र पहावयास मिळत होते. अनेक वाहने धूळखात पडली होती. मात्र, नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना देत पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक करून घेतला आहे.
-----------
पालिकेने कारवाई करावी
जयसिंगपूर : रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश असतानाही अनेकांना त्याचा विसर पडला आहे. नगरपालिकेने याबाबत जनजागृतीही केली होती. मात्र, काही नागरिकांना त्याचा विसर पडला आहे. रस्त्यावर कुठेही, कसेही थुंकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.