शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

शाहूंच्या जिल्ह्यातही महिला अत्याचारात वाढ

By admin | Updated: August 1, 2014 00:38 IST

वर्षा देशपांडे : बलात्काराचे ४८, विनयभंगाचे ६६ गुन्हे अद्याप प्रलंबित

गडहिंग्लज : पुरोगामी लोकराज्यात शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. एका वर्षातच बलात्काराच्या ४८, तर बलात्काराच्या गुन्ह्यात परिवर्तित होऊ शकणारे विनयभंगाचे ६६ गुन्हे प्रलंबित आहेत ही गंभीर बाब आहे, अशी माहिती राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बसर्गे येथील प्रकरणाच्या निमित्ताने त्या गडहिंग्लजला आल्या होत्या. यावेळी २०१२-१३ या केवळ एका वर्षातील महिलांवरील प्रलंबित अत्याचारांचा पाढाच त्यांनी वाचला.देशपांडे म्हणाल्या, गतवर्षी जिल्ह्यात हुंड्यासाठी खुनाचे ३, हुंडाबळीच्या १७, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल २५, अपहरणाबद्दल २२, तर पती व सासरच्या छळप्रकरणी तब्बल १४८ गुन्ह्यांची नोंद झाली. नोकरीच्या ठिकाणी अत्याचाराच्या ३२, अवैध व्यवसायास प्रवृत्त केल्याबद्दल ३, तर अश्लीलता प्रदर्शनाबद्दल २ गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत. बीड, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारात कोल्हापूरचा चौथा क्रमांक लागतो.मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेतदेखील ही आकडेवारी चिंताजनक आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात स्त्री-भृ्रणहत्या रोखण्यासाठी सायलेंट आॅब्जर्व्हचा प्रयोग झाला. मात्र, मुलींच्या संख्येत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे हा प्रयोगही अयशस्वी ठरला, त्यामुळे जिल्ह्यात या व्हाईट कॉलर क्राईममध्ये वाढ झाली आहे.महिलांवरील अत्याचारांबाबतही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तमिळनाडूमध्ये छेडछाड देखील दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र, पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात हाच गुन्हा अदखलपात्र आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात देखील पोलीसच आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांना आरोपी सापडत नाहीत. महिलांची अब्रू ही काही राजकारणासाठी वापरली जाणारी बाब नाही. मात्र, आर. आर. पाटील यांच्यासारख्या संवेदनशील गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीत मुंबईच्या शक्ती मिलमध्ये मीडियातील तरुणीवर झालेल्या बलात्काराचेदेखील मार्केटिंग करून राजकारणासाठी वापर झाला. ही लाजिरवाणी बाब आहे. यापुढे हे चालू देणार नाही, असा इशारा अ‍ॅड. देशपांडे यांनी दिला. यावेळी प्रा. स्वाती कोरी व कॉ. उज्ज्वला दळवी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)