शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-एकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:40 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुईकर कॉलनी, फिरंगाई, राजारामपुरी आदी ठिकाणी लसीकरणासाठी उभारलेल्या नागरिकांमध्ये वादावादीचे चित्र होते. रांगेत उभारूनही टोकन न मिळाल्याने अनेकांचा संताप चेहऱ्यावर दिसून येत होता.

ठळक मुद्देएकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच सावित्रीबाई फुलेंसह शहरातील अन्य लसीकरण केंद्रांतील चित्र

कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुईकर कॉलनी, फिरंगाई, राजारामपुरी आदी ठिकाणी लसीकरणासाठी उभारलेल्या नागरिकांमध्ये वादावादीचे चित्र होते. रांगेत उभारूनही टोकन न मिळाल्याने अनेकांचा संताप चेहऱ्यावर दिसून येत होता.गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन कोरोनापासून बचाव होण्यासाठी ४५ वर्षांवरील लोकांकरिता लसीकरण मोहीम जोरदारपणे राबवत आहे. पहिले काही दिवस लोकांना या लसीकरणाचे महत्त्व वाटले नाही. त्यामुळे अनेकांनी आता घेऊ, नंतर घेऊ असे करीत टंगळमंगळ केली. त्याचा परिणाम म्हणून संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेकजण सावध झाले.

त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लस टोचून घेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत. येणाऱ्यांची संख्या आणि लसी यांचे गणित जुळेनासे झाले आहे. शिल्लक असेल तर टोकन मिळत होते. नाही तर तासन्‌ तास रांगेत उभारूनही, लस तर मिळाली नाहीच, उलट मनस्ताप झाला, अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळाली.दुपारी एक वाजता सावित्रीबाई फुले रुग्णालयात २०० जणांकरिता लस उपलब्ध होती. मात्र, रांगेत उभारलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडले. अशीच परिस्थिती रुईकर कॉलनीतही होती. तेथेही अनेकजण रांगेत उभारले होते. त्यांना लस नाही, पण जे थेट रांगेविना आतमध्ये गेले, त्यांना लस मिळाली; अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटल