शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

खून करून दिशाभूल करण्याच्या प्रकारात वाढ

By admin | Updated: March 14, 2016 00:36 IST

दोन महिन्यांत अकरा खून : पोलिसही अवाक्; पुरावा सापडू नये म्हणून गुन्हेगारांकडून नव्या कल्पना

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी मृतदेहाची अत्यंत खबरदारीने विल्हेवाट लावीत आहेत. कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ११ खून झाल्याने गुन्हेगारांचे संकट पोलिसांना आव्हान बनले आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची दर महिन्याला गुन्हेविषयक बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक घेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, कौटुंबिक क्षणिक वादातून आतापर्यंत अकरा खून झाल्याची पोलिस रेकॉर्डला नोंद आहे. तीन खुनांचे गूढ आजही कायम वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोत्यात बांधून ठेवल्याच्या अवस्थेत आढळून आला. वाघबीळ घाटातील झुडपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे डोके गायब होते. किडे-मुंग्या लागून धड कुजले होते. त्याचे शवविच्छेदन करण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे करवीर पोलिसांनी त्या जागेवरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले; परंतु हा तरुण कोण? त्याचा खून कोणी केला? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर (वय ३४) याचा कसबा वाळवे गावानजीक उसाच्या शेतामध्ये डोळे बाहेर काढून निर्घृण खून केला गेला. त्याची ओळख पटूनही मारेकऱ्यांचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. पालक वर्गात भीतीराजेंद्रनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाला, हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फारच चिंताजनक आहे. अपहरणाच्या घटनांमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक आणि निरीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. - प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक