शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

संत साहित्याचा शिक्षणात समावेश आवश्यक : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:33 IST

नितीमूल्यांवर आधारित असलेल्या संत साहित्याचा आजच्या शिक्षणाला स्पर्श झाला तर भावी पिढीचे जीवन सावरायला मदत होईल. त्यांच्या शिक्षणाचा पाय मजबूत होईल, म्हणूनच शिक्षण पध्दतीत थोडा बदल करुन त्यामध्ये संत साहित्याचा समावेश होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे बोलताना केले.

ठळक मुद्देसंत साहित्याचा शिक्षणात समावेश आवश्यक : सुभाष देसाईआठव्या मराठी संत साहित्य संमेलनास प्रारंभ

कोल्हापूर : नितीमूल्यांवर आधारित असलेल्या संत साहित्याचा आजच्या शिक्षणाला स्पर्श झाला तर भावी पिढीचे जीवन सावरायला मदत होईल. त्यांच्या शिक्षणाचा पाय मजबूत होईल, म्हणूनच शिक्षण पध्दतीत थोडा बदल करुन त्यामध्ये संत साहित्याचा समावेश होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे बोलताना केले.करवीर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर शनिवारपासून वारकरी साहित्य परिषदेच्या आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन मंत्री देसाई यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन तसेच वीणा पूजनाने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमृतमहाराज जोशी होते. या प्रसंगी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, अदृष्य काडसिध्देश्वर स्वामी, निवृत्ती महाराज नामदास, महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्यासह राज्यभरातून आलेल्या फडांचे प्रमुख, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात संत वाङ् मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. संत वाङ् मयाच्या सहायाने शिक्षणाचा पाया मजबूत करु, अशी ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली.यावेळी संमेलनाचे खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.उद्योगमंत्री  देसाई पुढे म्हणाले, हे वारकरी साहित्य संमेलन राज्याला मार्गदर्शन करेल. संतांच्या परंपरेत जात, धर्म, वर्ण, लहान, मोठा असा भेदभाव न करता ज्यांनी पांडुरंगाचा जयजयकार केला, त्याला महाराष्ट्राने मस्तकी धरला आहे. समाजातील विषमतेवर संतांनी आपल्या कीर्तनातून, भजनातून आघात केला. महाराष्ट्राने साहित्याच्या अभ्यासकांनाही सन्मान दिला आहे, त्यांना मुजरा केला आहे. महाराष्ट्र शासन ज्ञानोबा, तुकाराम यांच्या नावाने पुरस्कार देवून नेहमीच सन्मानित करते. वृध्द कलाकारांना मानधन देण्याची तरतूद हा एक कीर्तनकार, भजनकार यांचा सन्मान आहे.जीवन भरकटत असताना संतांचे विचारच मानवांना मार्गावर ठेवतात, असे सांगून उद्योगमंत्री पुढे म्हणाले, मराठी भाषा ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. राज्यातील प्रत्येकाला ही भाषा आलीच पाहिजे. मराठीचा सन्मान कदापीही कमी होवू देणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तात्काळ मिळावा, अशी मागणी प्रधानमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे, ती निश्चित मान्य होईल, असा विश्वास आहे. संतांच्या वाङ् मयाचा आपल्या शिक्षणाला स्पर्श व्हावा. यासाठी त्याचा समावेश शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. अमृतमहाराज म्हणाले, वारकऱ्यांनी कीर्तनातून आणि भजनातून क्रांतीचे विचार विज्ञान युगापर्यंत पोहचविले. शेख महंमद आणि माणकोजी महाराजांचे वाङ् मय संशोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत यायला हवं ज्ञानदेव आणि तुकारामांचं नाव घेतलं की, जगातील सगळ्या संतांचं नाव त्यात आलं. जीवनातील विकासात्मक प्रकल्पांचं विषय संत साहित्यामध्ये दिलं आहे. येणाऱ्या काळात परिवर्तनवादी व्हायला हवं.वर्तमानकाळ वाचक जीवन जगण महत्वाचं आहे, असेही ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. ह.भ.प. निवृत्तीमहाराज नामदास, ह.भ.प. प्रभाकर बोधलेमहाराज, ह.भ.प. भानुदासमहाराज आणि ह.भ.प. उषाताई कांबळे यांना विशेष विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनीही यावेळी आशीर्वचन दिले.पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी स्वागत तर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राचं आभार ह.भ.प. यादव महाराज यांनी आभार मानले. कीर्तनकार उषाताई कांबळे यांनी म्हटलेल्या पसायदानानंतर सत्राची सांगता झाली.

 

 

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईkolhapurकोल्हापूर