शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:56 IST

राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश कराअखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.दुपारी दसरा चौक येथून मोर्चाला सुुरुवात झाली. आमच्या मागण्या मान्य करा, समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशा घोषणा देत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी ठिय्या मारून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मोहोरकर, आदींसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. डोंबारी समाजाचे राज्यात मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. हा समाज देशातील भूमिपुत्र आहे. पूर्वी हा समाज जंगलात राहत होता. या ठिकाणी टोळ्यांमध्ये युद्ध होऊन हा समाज गावांमध्ये येऊन राहू लागला. तो उपेक्षित व वंचित आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजाही त्याला पुरेशा मिळत नाहीत.

भिक्षा मागणे, डुक्कर पाळणे, नाचगाणे करणे, मोलमजुरी करून हा समाज जीवन जगत आहे. गावात घर नाही व शिवारात शेत नाही. गावाच्या माळावर पालामध्ये हलाखीच्या अवस्थेत हा समाज जगत असून शिक्षणाचे प्रमाणही नगण्य आहे. यासाठी या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.आंदोलनात मनोहर ताथवडकर, यशवंत लाखे, चंद्रकांत जावळे, शामराव जावळे, संपतराव जावळे, विशाल डावाळे, रणजित औंधकर, पुष्पा सोनटक्के, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर