जाकीर शिकलगार (पुणे) तालुक्यात अंजुमन ट्रस्टच्या धर्तीवर इतर सेवाभावी संस्था, युवक मंडळ, समाज कमिटी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी एकत्रितपणे काम करून शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याचे विधायक कार्य करू शकतात यासाठी महाराष्ट्र मायनाॅरिटी एनजीओ फोरमचा पायलट प्रोजेक्ट मायनाॅरिटी डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर, डाटा आणि प्लानिंग सेंटर, अकादमी फाॅर कंपेटिटीव्ह एक्झाम, ह्यूमन राईट व लिगल फोरम, स्कील डेव्हलपमेंट फोरम, टेक्नोबिझ, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार व आर्थिक मार्गदर्शन अशा १५ कलमी कार्यक्रमांतर्गत योजना सुरू करण्यात येणार आहेत. शिष्यवृत्ती योजनांची माहिती इरफान सय्यद यांनी तर आशपाक खान यांनी कोर्सेसविषयी माहिती दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सलीम पटेकर, अहमद जुबेर काझी, पाच्छासो काझी, बाबासाहेब मुल्ला, मलिक मुल्ला, मजीद अत्तार, माजी ग्रामपंचायत सदस्य. आदम नाईक, कलीम मदार, गणी मुल्ला, तयीम मुल्ला, शहानुर मदार, आरिफ खेडेकर, अस्लम तगारे, उस्मान मुल्ला, हाफिज सिकंदर सय्यद उपस्थित होते. प्रास्ताविक अंजुमन ट्रस्टचे अध्यक्ष तजम्मुल फणीबंद यांनी केले.
फोटो ओळी : केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात जाकिर शिकलगार, ट्रस्टचे अध्यक्ष तजमुल्ल फनीबंद व मान्यवर उपस्थित होते.
क्रमांक : २००९२०२१-गड-०३