वारणानगर : राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत शेतकरी सहकारी संघाने वारणा दूध संघाची उत्पादने ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली असून, शेतकरी संघाच्या कार्यक्षेत्रातील जागेत हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी नवीन विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराजवळील कपिलतीर्थ मार्केट येथे शेतकरी संघाच्या जागेत वारणा दूध संघाच्या वारणा दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन अध्यक्ष जी. डी. पाटील व वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासो पाटील (भुयेकर), माजी अध्यक्ष अमरसिंह माने, मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, दूध संघाचे अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंगचे एस. एल. मगदूम, अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, सिव्हील इंजिनियर शरद शेटे, श्रीधर बुधाळे, नवनाथ सूर्यवंशी, सचिन सरनोबत, बी. एस. पाटील, संतोष शिंदे, सचिन माने, उत्तम कणेरकर, पांडुरंग मोहिते, संभाजी पाटील, विश्वास जाधव उपस्थित होते.
फोटो ओळी... कोल्हापूर येथील ताराबाई रोड कपिलतीर्थ मार्केट येथील शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीत वारणा दूध संघाच्या वारणा दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील व वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष बाबासो पाटील (भुयेकर), अमरसिंह माने उपस्थित होते.