शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या शुभंकराचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:27 IST

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

ठळक मुद्दे‘चिल्लर पार्टी’ला मुख्याध्यापकांच्या शुभेच्छा महानगरपालिकेतील २५00 विद्यार्थी होणार सहभागी

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर विद्यालयात झालेल्या महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक उषा सरदेसाई, खांडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्यामला पवार आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सलग दोन दिवस शाहू स्मारक भवन येथे रंगणाऱ्या या महोत्सवात जगभरातील सहा उत्तम चित्रपट या विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार आहेत.वि. स. खांडेकर विद्यालयात झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद कोपार्डेकर यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली, तर बालचित्रपट महोत्सवाचे समन्वयक मिलिंद नाईक यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली.महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी यावेळी चिल्लर पार्टीच्या कामाचे कौतुक करून आशयघन चित्रपटांमुळे मुलांच्या ज्ञानाचे भांडार वाढेल, असे सांगितले.कागदाचे विमान उडविणाऱ्या मुलीचे छायाचित्र हा यावेळच्या बालचित्रपट महोत्सवाचा ‘शुभंकर’ आहे. यावेळी सर्व शाळांमधील विद्यार्थी कागदाचे विमान तयार करणार असून सर्व कागदी विमानांचे प्रदर्शन चिल्लर पार्टीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा कागद चिल्लर पार्टीने उपलब्ध करून दिला.या बैठकीत महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ३५ हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शिक्षक नेते सुधाकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर अभय बकरे यांनी आभार मानले. यावेळी सलीम महालकरी, चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, गुलाबराव देशमुख, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर