मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत बी. एन. पाटील-मुगळीकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अवधूत विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पाटील यांच्या स्मरणार्थ हे व्यापारी संकुल बांधले आहे.
मुश्रीफ म्हणाले, स्व. बी. एन. पाटील-मुगळीकर यांनी पक्षकार्याबरोबर सहकारातही चांगले योगदान दिले आहे. हे व्यापारी संकुल त्यांच्या कार्याची आठवण करून देईल व त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. अवधूत संस्थेने केलेले काम कौतुकास्पद आहे.
यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा बँक संचालक संतोष पाटील, हिरा शुगरचे सोमनाथ आरबोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील-मुगळीकर, सरपंच गुरुलिंग स्वामी, बाळासाहेब हुळ्ळोळी, रायगोंडा पाटील, सुभाष शिरकोळी, जोती मुसळे, मल्लाप्पा चौगुले, सुरेश धनवडे, अशोक महाडिक, बाबू आरबोळे, आप्पासो पाटील, प्रकाश माने, गणपती भोसले, बाळू कुंभार, सुभदा जाधव, सविता हुल्लोळी, रंजना भोसले, आदी उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळी : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील बी. एन. पाटील-मुगळीकर व्यापारी संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रमांक : ०४०४२०२१-गड-०१