कोपार्डे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीतून आज अशुद्ध पाणीपुरवठा झाला. आज साायंकाळी झालेला पाणीपुरवठा अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारही केेेल्या आहेत.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीतून पाणी बालिंगा जलशुद्धीकरण टाकले जाते. येथे जलशुद्धीकरण करून ते चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून उपनगर शहराचा निम्मा भाग ग्रामीण भागात झालेल्या अनेक कॉलनी ना चंबुखडी येथील टाकीमधून पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो.
आज सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात आलेल्या भागाला अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला आल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या महामारीत अशा शुद्ध पाणीपुरवठ्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. आज चंबूखडी येथील पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून अशुद्ध पाणी आल्याची माहिती दिली; पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे असे नदीला गढूळ पाणी आल्याचे सांंगून हात झटकले, असे सांगितले.
प्रतिक्रिया
आज सायंकाळी नळाला आलेले पाणी अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त आहे. असे पाणी पिल्याने आजारी पडण्याचा संभव आहे. अगोदरच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे, यात अशा अस्वच्छ पाण्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात.
-ख्रिस्तोफर जॉन्सन (रहिवासी, बटुकेश्वर कॉलनी, चंबूखडी)
फोटो
चंबूखडी पाण्याच्या टाकीतून नळाला झालेला गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा.