शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दुधाळी मैदानाचा होतोय कायापालट, विकासकामांबद्दल खेळाडूंमधून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:19 IST

शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ यांसह लक्षतीर्थ वसाहत यांसारख्या उपनगरांतील खेळाडूंचे हक्कांचे मैदान म्हणजे दुधाळी मैदान होय. सध्या दुधाळी मैदानाची विकासकामे सध्या सुरू असल्याने दुधाळी मैदानाचा कायापालट होत आहे. मैदानाच्या या विकासकामांबद्दल खेळाडूंमधून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देदुधाळी मैदानाचा होतोय कायापालटविकासकामांबद्दल खेळाडूंमधून कौतुक

कोल्हापूर : शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ यांसह लक्षतीर्थ वसाहत यांसारख्या उपनगरांतील खेळाडूंचे हक्कांचे मैदान म्हणजे दुधाळी मैदान होय. सध्या दुधाळी मैदानाची विकासकामे सध्या सुरू असल्याने दुधाळी मैदानाचा कायापालट होत आहे. मैदानाच्या या विकासकामांबद्दल खेळाडूंमधून कौतुक होत आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुधाळी नाल्याच्या बाजूलाच दुधाळी मैदान आहे; तर या मैदानाच्या तिन्ही बाजूंनी नाल्याच्या सीमा आहेत. या नाल्याच्या बाजूने महानगरपालिकेने रिटेनिंग वॉल बांधल्या आहेत. या भिंती काही ठिकाणी पडल्या असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.

हे पाणी पावसाळ्यात मैदानात घुसते; पण त्याकडे महानगरपालिकेचे लक्ष नसल्याची स्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळते. मात्र, स्थानिक नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नांमधून मैदानाचे रूपडे बदलत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोल्हापुरातील दुधाळी मैदान येथे टर्फ मैदानाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. (छाया : दीपक जाधव)या मैदानावर प्रामुख्याने क्रिकेटसह, फुटबॉल संघ सराव करतात. येथील मैदानातील विकेट खराब झाल्याने मैदानाच्या मध्यभागी सध्या क्रिकेट पिच करण्याचे काम सुरू आहे. दुधाळी पॅव्हेलियनमधील बॅटमिंटन हॉलमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून वूडन कोर्ट करण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. उन्हाळी सुटी पडणार असल्याने खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी हे काम जलदगतीने सुरू व्हावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

या ठिकाणी असलेली स्वच्छतागृहेही दुरुस्त करण्यात यावीत, अशी मागणी खेळाडूंमधून होत आहे. पॅव्हेलियनचे पत्रे बदलले आहेत. मात्र खिडक्या व दरवाजे मोडकळीस आले आहेत, ते बदलण्याची मागणी केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी ते तत्काळ बदलावेत, अशी मागणी खेळाडूंमधून केली जात आहे.या परिसरातील महानगरपालिकेची एकमेव व्यायामशाळा येथे सुरू आहे. अल्पदरामध्ये तसेच अद्ययावत साहित्यसाम्रगीसह हे व्यायामाचे साहित्य उपलब्ध असल्याने तरुणाईची मोठी गर्दी येथी होत आहे. यासह मैदानात एका बाजूला व्यायाम करण्यासाठी साहित्य बसविले आहे.

त्याचा फायदा ज्येष्ठांसह अन्य खेळाडूंना मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे रात्रीच्या वेळी मद्यप्यांचा त्रास होते. तो कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मैदानात सर्वत्र प्रकाशाची व्यवस्था करून पोलिसांनी वारंवार या ठिकाणी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शूटिंग रेंज... सामान्य खेळाडूंचा आधारकोल्हापूर महानगरपालिकेच्या दुधाळी शूटिंग रेंजवर सराव करून नेमबाजीसारख्या खेळात नावलौकिकाची कोल्हापूरची उज्ज्वल परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर, संदीप तरटे, अगदी अलीकडे शाहू माने, अनुष्का पाटील, वीरभद्र साळोखे, अदिज्ञा पाटील असे दिग्गज नेमबाजपटू याच रेंजमधून घडले.

जुनी रेंज ६५ वर्षांपूर्वीची आहे. सन २००० मध्ये नव्या रेंजची उभारणी झाली. शासनाच्या वतीने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, ही जमेची बाजू आहे. उन्हाळी प्रशिक्षण वर्गही येथे भरविले जातात. यामध्ये विविध स्पर्धांबाबत माहिती, बंदुकीमधील साहित्याची माहिती, शूटिंगमधील प्रकारांविषयी मार्गदर्शन, शूटिंगचा सराव करून घेण्यात येतो. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यामुळे अनेक सामान्य खेळाडूंसाठी हा आधार बनला आहे.

टर्फ मैदानआमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून दुधाळी मैदानात येथे सुमारे ६१ लाखांचे टर्फ मैदानाचे काम सुरू आहे. यामुळे विविध खेळ खेळता येणार आहेत. तसेच या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच स्वच्छतागृहाची सुविधा खेळाडूंना मिळणार आहे. याचे कामही सुरू आहे. यामुळे विविध खेळांना चालना मिळणार आहे.

दुधाळी मैदानाच्या सभोवती असलेल्या नाल्यांना रिटेनिंग वॉल नसल्याने पावसाळ्यात सगळे सांडपाणी मैदानात घुसत होते. ही समस्या खूप मोठी होती. त्यामुळे मैदानात खेळण्यासाठी वापरता येत नव्हते. मात्र आता रिटेनिंग वॉल बांधल्याने ही समस्या मिटली आहे.युवराज जाधव, नागरिक

 

दुधाळी मैदानात पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी सुधारणा झाली आहे. मैदानात मुरूम टाकून वारंवार रोलिंग केले जाते. येथील व्यायामशाळा चांगली आहे. ओपन जिमसाठी जरा साहित्य वाढविले की आणखी सोईचे होईल.अजित पाटील-घरपणकर, खेळाडू

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर