कोल्हापूर : ‘जागतिक माती दिन’निमित्ताने वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या बियारोपण तसेच रोप तयार करण्याची लहान मुलांची कार्यशाळा घेण्यात आली. मातीशी नाते जोडताना ही मुले आनंदून गेली.
लहान मुलांना आतापासूनच मातीचे महत्त्व कळावे, मातीशी त्यांचे नाते घट्ट व्हावे, पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी तसेच भविष्यात त्यांच्यासाठी नैसर्गिक सुबत्तता सुरक्षित राहावी हा संस्कार जोपासण्याच्या दृष्टिकोनातून या मुलांना पर्यावरणीय संरक्षण, झाडांची व रोपांची ओळख, उपयोग असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये यामध्ये प्रामुख्याने रत्नकुंज, शंकासुर, टॅबू बिया, रोझिया, तुतू, बहावा, करंज, गूळभेंडी, बेल अशी अनेक रोपे तयार करण्यात आली. कार्यशाळेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, साजिद शेख, विकास कोंडेकर यांनी मार्गदर्शन केले.
०५१२२०२०-कोल-माती कार्यशाळा
कोल्हापुरात शनिवारी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या बियारोपण तसेच रोप तयार करण्याची लहान मुलांची कार्यशाळा घेतली.