शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णासाठी डॉक्टरइतकीच नर्स महत्त्वाची राज्यपालांचे गौरवोद््गार

By admin | Updated: May 8, 2014 12:07 IST

बेल एअर नर्सिंग कॉलेजला तीन लाखांची देणगी जाहीर

पाचगणी : ‘नर्सेसना रुग्णाबरोबर थांबावे लागते. त्याची सेवा करावी लागते. त्यामुळे रुग्णाला डॉक्टरपेक्षा नर्सेस महत्त्वाच्या वाटतात. रुग्णसेवेबरोबरच त्याला मानसिक आधार देणार्‍या नर्सेसचे काम डॉक्टरइतकेच महत्त्वाचे असून, बेल एअर नर्सिंग कॉलेज चांगल्या नर्सेस घडविण्यात देशात आघाडीवर असल्याचे मला कौतुक वाटते,’ असे प्रशंसोद््गार राज्यपाल तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष के. आर. नारायणन यांनी काढले. महाविद्यालयासाठी तीन लाख रुपयांची देणगीही त्यांनी जाहीर केली. रेडक्रॉस सोसायटीच्या १५१ व्या वधापनदिनानिमित्त ‘माय स्टोरी’ हा सप्ताह २ ते ८ मे या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यपाल के. आर. नारायणन यांनी बेल एअर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कºहाडकर, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, फादर टॉमी, फादर ब्ेनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव धस आदी मान्यवर उपस्थित होते. के. आर. नारायणन म्हणाले, ‘नर्सिंग हे सेवाभावी काम असल्याने त्याला वैद्यकक्षेत्रात फार महत्त्व आहे. केरळ राज्याप्रमाणेच बेल एअर नर्सिंग कॉलेजमध्ये इतर राज्यातील विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असल्याने हे कॉलेज ‘मिनी इंडिया’ बनले आहे. एकमेकांच्या सहवासातून नर्सिंगची सेवाभावी वृत्ती वाढण्यास मदत होणार असून, या कॉलेजची काम करण्याची पद्धती, वातावरण आणि विद्यार्थिनींना शिक्षणात मिळत असलेला आनंद पाहून मलाही मनोमन आनंद झाला आहे. बेल एअर नर्सिंग कॉलेज पाचगणीमधून जागतिक दर्जाचे शिक्षण देत असून इतर नर्सिंग कॉलेजनी बेल एअरचे अनुकरण केले पाहिजे.’ ‘रेडक्रॉस’च्या सचिव हुमायू मोदी म्हणाल्या, ‘गेल्या आठ वर्षांच्या काळात या कॉलेजने फार मोठी प्रगती साधली आहे. संशोधन प्रकल्पामुळे या कॉलेजचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणार आहे. लवकरच वाई परिसरात अद्ययावत रुग्णालयाची उभारणी करून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी राज्यपालांनी काही विद्यार्थिनींशी मल्याळम भाषेत संवाद साधला. कॉलेजविषयी माहिती विचारली. विद्यार्थिनींनी कॉलेजच्या प्रशासनाची, शिस्तीची, उपक्रमांची माहिती दिली. राज्यपालांनी बेल एअर रुग्णालयातील प्रयोगशाळा, ओपीडी, निसर्गोपचार केंद्र, मसाज केंद्र, फार्मसी कार्यालय, डेअरी प्रकल्प आदी विभागांना भेटी दिल्या; तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांशी संवाद साधला. यावेळी महाबळेश्वरचे मुख्याधिकारी सचिन पवार, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित होस्तानी, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, बेल एअर नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या लुई मेरी, फादर विल्सन, रेडक्रॉसचे जतीन उपस्थित होते. (वार्ताहर)