शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार : डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:30 IST

Shivaji University, vichechanclar, studetnts, educationsector, kolhapurnews, कोल्हापुरातील उद्योग जगताबाबत माझा अभ्यास आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

ठळक मुद्देविद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार : डी. टी. शिर्के कोल्हापुरातील औद्योगिक संघटनांतर्फे सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योग जगताबाबत माझा अभ्यास आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्यावतीने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

औद्योगिक संघटना आणि विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुशल मनुष्यबळ उद्योगांना मिळणे आहे. त्याच्याशिवाय विद्यापीठाकडे अनेक यंत्रसामग्री, माहिती तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा उपयोग उद्योजकांना करता यावा यासाठी उपक्रम राबवले आहेत.

विद्यापीठ आणि उद्योजक यांच्यामध्ये नेहमी सुसंवाद, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, अशी मागणी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, सचिव दिनेश बुधले, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, संचालक नितीन वाडीकर, सचिन मेनन, अमर करांडे, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅक-कागल असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पेंडसे, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर