निवेदनात, शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने कामगारांची संख्याही अधिक आहे. सर्व कामगार व गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे, या दृष्टीने केंद्र शासनाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयातर्फे जून २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या. तर राज्य शासनाने ९ डिसेंबर २०१५ रोजी निर्गमित केले. या संदर्भात वारंवार मागणी करूनही अद्याप अंमलबजावणी केली नाही. तसेच इचलकरंजी नगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाच्या मालकीची शहापूर येथील गट नं. ४६८ मध्ये घरे बांधण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव केला. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला आहे. तरीही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे. निवेदनावर हणमंत लोहार, महेश लोहार, मारुती आजगेकर, दादासो जगदाळे, मीना भोरे, वर्षा जाधव, सायरा मुल्ला आदींच्या सह्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेची त्वरित अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST